ठाणे : ठाण्यातील ज्येष्ठ वास्तूरचनाकार वसंत पाणसारे यांचे आज रात्री 8 वाजता वयाच्या ९३ वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे दोन भाऊ आणि भावांचे कुटुंबिय असा परिवार आहे.ठाण्यातील नौपाडा भागात वसंत पाणसारे वास्तव्यास होते. त्यांनी तब्बल आठ दशके ठाणे शहरातील प्रमुख वास्तूंसाठी वास्तूविशारद म्हणून काम पाहिले. शहरातील राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे महापालिकेची मुख्य इमारत, दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि ठाणे महाविद्यालय यासारख्या शहरातील महत्वाच्या आणि आकर्षणाच्या केंद्रबिंदू असलेल्या इमारती घडवण्याचे कार्य पाणसारे यांच्या हातून पार पडले आहे. ठाण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी असलेल्या पानसरे यांनी मुंबईतील जे.जे. महाविद्याालयातून शिक्षण पूर्ण केले होते. गुरुवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. रात्री उशीरा ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ठाण्याच्या न्यू इंग्लिश स्कुलचे विद्यार्थी असणाऱ्या पाणसारे यांनी मुंबईतील जे.जे. महाविद्याालयातून शिक्षण पुर्ण केले होते. याच विषयातील पुढचा अभ्यासातही त्यांनी थेट इंग्लड ला जाऊन उच्च शिक्षण घेतले .मुंबईतल्या अनेक उंच इमारती शैक्षणिक संस्था उभारण्याचा अनुभव असणाऱ्या पाणसरे यांना ठाणे शहरातील प्रथम नाट्यगृह असलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या प्रमुख वास्तुविशारदेच्या भूमिकेसाठी विचारणा झाली .
पाणसरे यांनी सूत्र हातात घेत भव्य रंगमंच , सभागृह , मेकअप रूम , नाट्यगृहाच्या खालच्या भागात रियल्सल रूम ,व्हीआयपी रूम , कलाकारांना राहण्यासाठी खोल्या , कलाप्रदर्शनासाठी परिसर आदी सुविधांसह राम गणेश गडकरी रंगायतन हे नाट्यगृह १९७७ च्या सुमारास नाट्यरसिकांच्या सेवेत केले .या खेरीज शहरातील अनेक कंम्पन्या , खाजगी वास्तू पाणसरे यांनी घडवल्या आहेत .