शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

काेराेनाची लस घेण्यात ज्येष्ठ नागरिक आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 11:22 PM

४५ ते ६० वयोगटातील केवळ ७२० नागरिकांनीच घेतली लस

अजित मांडकेलोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यासह जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. परंतु, ठाण्यात इतर वयोगटातील नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने लस घेण्यात आघाडीवर आहेत. मागील १० दिवसांत चार हजार ६८८ ज्येष्ठांनी कोरोनाची लस घेतली आहे. तर ४५ ते ६० वयोगटातील केवळ ७२० नागरिकांनीच ती घेतली आहे. त्यातही पैसे देऊन खाजगी रुग्णालयात लस घेणाऱ्यातही ज्येष्ठच आघाडीवर आहेत.

ठाणे  महापालिका हद्दीत ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्ष वयोगटातील परंतु त्यांना काही व्याधी असतील अशांचे लसीकरण १ मार्च पासून सुरू  झाले आहे. सुरुवातीला अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन होणो, तासनतास रांगेत उभे राहणे अशा तक्रारी समोर येत होत्या. परंतु, आता ते प्रमाण काही अंशी का होईना कमी झाल्याचे दिसत आहे. शहरात आजघडीला शासकीय आणि खाजगी रुग्णालय मिळून ५१ ठिकाणी लसीकरण सुरू आहे. त्यानुसार मागील १० दिवसात सात हजार ७९ नागरिकांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. यामध्ये शासकीय केंद्रावर पाच हजार ३२२ आणि खाजगी रुग्णालयात एक हजार ७५७ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

तरुणांपेक्षा ज्येष्ठ एक पाऊल पुढे 

लस घेणाऱ्यांमध्ये ज्येष्ठांची संख्या ही अधिक आहे. आतापर्यंत चार हजार ६८८ ज्येष्ठांनी लस टोचून घेतली असून ४५ ते ६० वर्षे वयोगटातील ७२० जणांनीच ती घेतल्याचे दिसून आले आहे. त्यातही शासकीय बरोबर खाजगी रुग्णालयातही ज्येष्ठ आघाडीवर  आहेत. त्यामुळे तरुणांपेक्षा ज्येष्ठ पाच पावले पुढेच असल्याचे दिसून आले आहे.

मी लस घेतली, तुम्ही ?...

कोरोनाचा जास्त धोका हा आम्हा ज्येष्ठांनाच अधिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आम्ही आमची काळजी घेऊन लस  घेतली आहे. तिचा कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही.    - शुभदा देसाई,  ज्येष्ठ महिला 

मनात कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता मी स्वत: पुढाकार घेऊन कोरोनाची लस घेतली आहे. आपल्याला या आजारापासून सुटका करून घ्यायची असल्याने मी लस घेतली.    - सुरेश पाठक, ज्येष्ठ नागरिक

पैसे देऊन लस घेण्यातही ज्येष्ठ नागरिकच पुढेशासकीय पाठोपाठ ठाण्यात आता १० खाजगी रुग्णालयाच्या ठिकाणी लसीकरण सुरू झालेले आहे. या रुग्णालयातही लस घेण्यात तरुणांपेक्षा ज्येष्ठच आघाडीवर आहेत. खाजगी १० केंद्रावर एक हजार १७९ ज्येष्ठांनी आतापर्यंत लस टोचून घेतली आहे. तर ४५ ते ६० वयोगटातील केवळ ३०४ जणांनी पैसे खर्च करून लस घेतली आहे.

जिल्ह्यातही ज्येष्ठ नागरिक आघाडीवरचठाणे महापालिकेसह जिल्ह्यातील कल्याण-डाेंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा -भाइर्ंदर आणि नवी मुंबइर् महापालिका हद्दीतही तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरिकच लस घेण्यात आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. या महापालिका हद्दीत ३४३८९ ज्येष्ठ नागरिकांनी आत्तापर्यंत काेराेनाची लस घेतली आहे. तर ४५ ते ६० वयाेगटातील ३९९१ जणांनी लस घेतल्याची माहिती समाेर आली आहे.

टॅग्स :thaneठाणे