शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

५ व्या माय ठाणे शॉर्टफिल्म फेस्टीवलमध्ये जेष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांना "चित्ररत्न"पुरस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 4:13 PM

५ व्या माय ठाणे शॉर्टफिल्म फेस्टीवलमध्ये जेष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांचा "चित्ररत्न"पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.  

ठळक मुद्देजेष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांना "चित्ररत्न"पुरस्कार ५ वा माय ठाणे शॉर्टफिल्म फेस्टीवलभारत देशांमधून तब्बल १५० चित्रपट प्राप्त

ठाणे:५ व्या माय ठाणे शॉर्टफिल्म फेस्टीवल मध्ये, नाट्य, , चित्र, क्षेत्रांत भरीव कामगिरी करणारे प्रसिद्ध जेष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांचा "चित्ररत्न"पुरस्कार देवून गौरव ब्लू एंटरटेंटमेंट व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय आयोजित ५ व्या माय ठाणे शॉर्टफिल्म फेस्टीवलमध्ये पी सावळाराम सभागृहात रविवारी देण्यात आला.              

        महाराष्ट्रातील नाट्य,  चित्र, क्षेत्रांत श्रेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गेल्या ३ वर्षांपासून "चित्ररत्न" पुरस्काराने सन्मान ठाणे शॉर्टफिल्म फेस्टीवल मध्ये केला जातो..या निमित्ताने सकाळी शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेची आयोजन केले होते. जवळपास ३०० विद्यार्थ्यांना यामध्ये सहभाग घेतला या फेस्टीवलचा मुख्य कार्यक्रम म्हणजे बक्षिस वितरण व चित्ररत्न पुरस्काराचे वितरण यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ठामपा उपमहापौर पल्लवी पवन कदम,अभिनेत्री नम्रता सुंभेराव,उपस्थित होते. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.डी.मराठे, डॉ.प्रदीप ढवळ,ब्लू एंटरटेंटमेंटचे पार्टनर प्रा. एकनाथ सोपान पवळे,पार्टनर डॉ .गणेश घुगरे उपस्थित होते. या कार्यक्रमाला तरूण संगीतकार विशाल राणे,अभिनेता विकास थोरात ,डॉ उल्हास वाघ,इतिहास अभ्यासक सदाशिव टेटविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश प्रधान,सचिव कमलेश प्रधान,खजिनदार सतिश सेठ यांनी मोलाचे सहकार्य मिळाले. "तुमच्या सारख्या तरुण मुलांना कधी मार्गदर्शन हवे असेल तर मला कळवा मी आवश्य येईल. असे जयंत सावरकर यांनी या वेळी म्हटले. ब्लू एंटरटेंटमेंट व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय आयोजित ५ व्या माय ठाणे शॉर्टफिल्म फेस्टीवल प्रेमी ज्याची आतुरतेने वाट पहात असतात अशा शॉर्टफिल्म फेस्टीवल मध्ये यावर्षी भारत देशांमधून तब्बल १५० चित्रपट प्राप्त झाले होते. त्यांपैकी निवडक सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक मूल्यांवर प्रकाश टाकणारे ६६ चित्रपट पाहण्याची संधी शॉर्टफिल्म फेस्टीवल दरम्यान चित्रपट रसिकांना मिळाली. प्लिज फॉरगीव मी,आधा चॉदं तुम रखलो,लव्हाळ,सौ.कौमारिनी, या शॉर्टफिल्मने फेस्टीवलमध्ये आपली छाप पाडली चित्रपटांबरोबरच चित्रपट विषयक चर्चासत्रे, कार्यशाळा आणि प्रदर्शन यांचाही समावेश दरवर्षी प्रमाणे या वर्षीच्या शॉर्टफिल्म फेस्टीवल मध्ये होता.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकShort Filmsशॉर्ट फिल्म