ठाणे : ठाणे महापालिकेने एका खाजगी संस्थेच्या मदतीने केलेल्या एका सर्व्हेत शहरातील ६० टक्के नागरिक पायी चालत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच आता या पादचाऱ्यांसह सायकलसाठी सर्व्हिस रोडवर एक वेगळी लेन देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, याचा अभ्यास झाला असून येत्या काही महिन्यांत ती खुली केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रस्त्यांचा आकार मात्र तेवढाच आहे. त्यामुळे शहरातील मुख्य जंक्शनवर सकाळ, सायंकाळच्या सुमारास कोंडी होत आहे. ती फोडण्यासाठी किंबहुना ठाणेकरांनी कमी अंतर कापण्यासाठी आपल्या खाजगी वाहनांचा वापर करण्याऐवजी सायकल अथवा पायी चालून ते कापावे, या उद्देशाने सॉफट मोबिलिटीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात आनंदनगर ते घोडबंदरपर्यंत ही लेन असणार आहे. तसेच टप्प्याटप्प्याने यांच्यासाठीही सिग्नल यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सर्व्हिस रोडवर सायकलिंग लेन?
By admin | Published: November 12, 2015 1:44 AM