शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
2
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
3
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
4
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
5
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
6
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
7
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
8
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
9
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
10
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
11
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
12
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
13
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
14
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
15
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
16
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
17
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
18
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
19
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
20
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

सात अग्निशमन बुलेट दाखल

By admin | Published: October 05, 2016 2:18 AM

वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलात सात अत्याधुनिक फायरफायटींग बुलेट दाखल झाल्या आहेत. मुंबई, पुणे, नाशिकनंतर वसई पालिकेने तब्बल ४७ लाख रुपये खर्चून बुलेट विकत घेतल्या आहेत.

वसई : वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलात सात अत्याधुनिक फायरफायटींग बुलेट दाखल झाल्या आहेत. मुंबई, पुणे, नाशिकनंतर वसई पालिकेने तब्बल ४७ लाख रुपये खर्चून बुलेट विकत घेतल्या आहेत. चौदा मजल्यापर्यंतची आग विझवण्यासाठीची सव्वा चार कोटी रुपयाची फायर गाडीही पालिकेच्या अग्निशमन दलाकडे आहे. शहर आणि ग्रामीण भागातील छोट्या रस्त्यावर फायरची मोठी गाडी जाणे कठीण होते. तसेच गल्ली बोळातील घरातील शॉर्ट सर्कीटची आग असेल, गॅस स्फ़ोटावर नियंत्रण मिळवण्यासाठी या बुलेटचा फायदा होणार आहे. त्याकरीता बुलेटवर आग विझवण्यासाठी लागणारी अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर साप पकडण्यासाठी फायर बुलेटचा वापर होणार आहे. साप पकडण्यासाठी बुलेटवर कॅचेरची व्यवस्था असून जवान सुरक्षित राहून साप पकडू शकणार आहेत.एका बुलेटची मूळ किंमत १ लाख ३ हजार १९२ इतकी आहे. या बुलेटवर अत्याधुनिक सामुग्री बसवल्यानंतर त्यांची किंमत ६ लाख ६८ हजार ९१२ रुपयांपर्यंत पोचली आहे. त्यामुळे सात बुलेटवर पालिकेला ४७ लाख ३ हजार ३४४ रुपये खर्च आला आहे. महापौर प्रवीणा ठाकूर यांच्या हस्ते बुलेट लोर्कापण करण्यात आल्या. यावेळी आयुक्त सतीश लोखंडे, स्थायी समिती सभापती नितीन राऊत, मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप पालव यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)