ठाणे : मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील १५८ न्यायाधीशांच्या बदल्या केल्या आहेत. यात ठाण्यातील सात न्यायाधीशांचा समावेश आहे. या सर्वांना ३ जून पूर्वी हजर व्हावे लागणार असल्याचे उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल एस.पी. तावडे यांनी आदेशात म्हटले.ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायमूर्ती एच.एम. पटवर्धन यांची सातारा सत्र न्यायालयात, के.आर. पाटील यांची बीडला, एस.ए. सिन्हा यांची अमरावती न्यायालयात, ए.व्ही. चौधरी इनामदार यांची कोल्हापूरला, डी.वाय. गौड यांची धुळे न्यायालयात, एस.आर. भोसले यांची शहर सिव्हिल कोर्ट मुंबई येथे तर,आर.एन. माजगावकर यांची हिंगणघाट येथे बदली झाली आहे.राज्याच्या विविध न्यायालयांतून ठाणे जिल्हा न्यायालयात सात न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. यात डी.जी. मुरूमकर यांची पुण्याहून, एस.एस. घोडके यांची नाशिक इंडस्ट्रियल कोर्ट, ए.व्ही. कदम यांची कोल्हापूर येथून, आर.एस. गुप्ता यांची नंदुरबार येथून, डी.एच. कळसुलकर यांची सातारा येथून, आर.आर. वैषण यांची सांगली येथून, तर ए.एस. पंढरीकर यांची खामगाव येथून ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात बदली झाली आहे.
ठाण्यातील सात न्यायाधीशांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 5:16 AM