या प्राथमिक शाळांमध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या एक हजार ३२८ प्राथमिक शाळांच्या ७७ हजार ८५२ विद्यार्थ्यांना तीन हजार ७३३ शिक्षकांकडून व मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइनसह विविध उपक्रमांतून शालेय शिक्षण देण्याचे नियोजन आहे. या शिक्षकांकडून दिशा ॲपद्वारे, स्मार्ट फोन, टीव्ही, साधा मोबाइल फोन आदींसह गटागटाने, पालकांना भेटून आणि मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांना विद्यार्थी दत्तक घेऊन, दुर्गम भागात ऑफलाइन शिक्षण, तर शाळा व्यवस्थापन समितीद्वारे मातापालक संघाकडून स्थानिक केबलद्वारे आणि रेडिओद्वारे प्राथमिक शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देण्याचे नियोजन गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही दिसून येत आहे.
--------
१) जिल्ह्यातील एकूण शाळा - २,९४८
२) अनुदानित शाळा - ४३४
३) अंशतः व विना अनुदानित शाळा - १,१८६
४) जि.प.च्या शाळा - १,३२८
--------
माझे वडील वारले आहेत. घरात आई एकमेव कमावती असून ती मोलमजुरी करून आमचे पोषण व शिक्षणाची जबाबदारी पार पाडत आहे. घरची आर्थिक परिस्थिती खूपच बेताची असल्याने अँड्रॉइड मोबाइल घेऊ शकत नाही. त्यामुळे शाळेतून आलेल्या सूचना, अभ्यास गावातील मैत्रिणीला विचारून जमेल तेवढा अभ्यास करण्याचा प्रयत्न करते.
- सोनाली सराई, इ. ११वी. ग.वि. खाडे विद्यालय, शहापूर.
--------
माझ्या घरात अँड्रॉइड मोबाइल नाही. चुलत भावाकडे असलेल्या अँड्रॉइड मोबाइलवर शाळेच्या तासिकांना उपस्थित राहतो. परंतु, चुलत भाऊ नेहमी कामासाठी बाहेर जात असल्याने बहुतेक वेळा शाळेच्या तासिका बुडतात. परंतु सध्या तरी दुसरा पर्याय माझ्याकडे नाही.
- पवन ठाकूर, इयत्ता ९वी
शासकीय आश्रम शाळा, सावरोली.