ठाणे: आपल्याच घरावर सायकल चालविताना तोल जाऊन कळवा खाडीमध्ये नागसेननगर येथील सात वर्षीय ऋषी उस्वा हा चिमुरडा पडल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्याचा शोध सुरू असून रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागू शकला नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.
ऋषी हा खाडीशेजारी असलेल्या घरावर १३ जुलै रोजी सायंकाळच्या वेळी सायकल चालवित होता. त्याचवेळी त्याचा तोल जाऊन तो कळवा खाडीमध्ये पडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे नगर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी तसेच ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत शोधकार्य हाती घेतले. तो खाडीमध्ये पडल्यानंतर १० ते १५ फूट लांब जाईपर्यंत काही लोकांच्या निदर्शनास आला.
मात्र, पाऊस आ िण समुद्राला ओहाेटी असल्यामुळे पाण्याचा वेग वाशीच्या िदशेने अिधक हाेता. त्यामुळे नंतर तो दिसेनासा झाला. दरम्यानच्या काळात त्याचे वडिल त्याच्यासाठी समोसा आणण्यासाठी गेले होते. ते समोसा घेऊन परतले तोपर्यंत हा प्रकार घडल्याचे त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना सांगितले. अग्निशमन दलाच्या जवानांनी कळवा ते अगदी कोपरी खाडीपर्यंत त्याचा शोध घेतला. मात्र, तो कुठेही रात्री ८ वाजेपर्यंत आढळला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.