ठाणे : महागिरी भागातील रशीद शेख यांचा मुलगा हुनेन रशीद शेख याने आपल्या आई-वडिलांकडे हट्ट करून वयाच्या ७ व्या वर्षी रमजानच्या पवित्र महिन्याचे संपूर्ण ३० दिवस उपवास केले. एवढ्या लहान वयात ३० दिवसांचे कडक उपवास जमणार नाही असे आई-वडिलानी सांगूनही त्याने हट्ट करून हे उपवास धरले. दोन-तीन दिवसांत तो आपला हट्ट सोडेल, असे त्यांना वाटले; पण हुनेनने हे उपवास सलग तीस दिवस पूर्ण करून रमजान ईद साजरी केली. यामुळे त्याचे परिसरातील सर्वांनी कौतुक केले. विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या वस्तू-चाॅकलेट बाॅक्सची ईदी देऊन त्याचा सत्कार केला. ठाणे जिल्हा इंटक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन शिंदे, भारतीय जनता पार्टीचे विशाल वाघ आदींनी त्याचा सत्कार करून कौतुक केले.
सात वर्षांच्या हुनेन शेखने पूर्ण केले रमजानचे उपवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:38 AM