शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
4
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
5
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
7
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
8
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
9
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
10
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
11
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
12
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
13
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
14
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
15
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
16
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
17
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
18
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
19
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
20
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई, ४० हजार ग्रामस्थांना २६ टँकरद्वारे पाणी पुरवठा!

By सुरेश लोखंडे | Published: April 18, 2023 7:36 PM

या गांवखे्यांच्या ४० हजार ग्रामस्थांना आजरोजी २६ खासगी टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे.

ठाणे: गावाजवळच्या धरणांचे पाणी जिल्ह्यातील शहराना पुरवणाऱ्या शहापूर तालुक्यातील १३४ गांवपाडे यंदा तीव्र पाणी टंचाईला तोंड देत आहेत. या गांवखे्यांच्या ४० हजार ग्रामस्थांना आजरोजी २६ खासगी टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे. या पाणी पुरवठ्यासाठी गेल्या वर्षाच्या तुलनेत आजरोजी दहा जादा टँकर गांवखे्यात धावत आहेत.मुंबई या महानगराला पाण पुरवठा करणारे सर्व धरणे शहापूर तालुक्यातील गांवखेड्यांच्या आजूबाजूला आहेत. मात्र तेथील पाणी या गांवखेड्यांना मिळत नाही. त्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त शहापूर तालुका पाणी टंचाईला तोंड देत आहे. गेल्या वर्षी आजरोजी अवघे १६ टँकर पाणी पुरवठा करीत होते. मात्र आजच्या तारखेला यंदा २६टँकरव्दारे या १३४ गांवपा्यांना पाणी पुरवठा ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून केला जात आहे.तेथील ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी उन्हातान्हात भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात उष्णतेची लाट पसरली आहे.जीव घेण्या उन्हामुळे या गावातील महिला व गांवकऱ्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरचे चातकाप्रमाणे वाट पाहावी लागत आहे. या शहापूरच्या २४ गांवे व ११० पाड्यांना तीव्र पाणी टंचाई सुरू झाली आहे. त्यावर २६ टँकरव्दारे मात करून या गांवपाड्यांची तहान भागवली जात आहे. त्यांच्या या पाणी समस्येवर मात करण्यासाठी राज्य शासनाने २०२० मध्ये भावली पाणी पुरवठा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याचे कामाने आजपर्यंतही गती घेतलेली दिसून येत नसल्यामुळे गांवकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय.    

या टंचाईग्रस्त गांवाना २६ टँकरव्दारे पाणी पुरवठा-- धामणी ग्राम पंचायतीमधील गोलभण, जरंडी गांवासह भुईपाडा.अजनुप ग्रा.प.चे तीन पाडे. ढाढरेची उंबरवाडी. कसारा- उंम्रावणे, दांड, बिबळवाडी, पायरवाडी. कोठारे-कोळीपाडा. नांदवळचे दोन पाडे. वेळुकचे पिंगळवाडी. उंबरखांडचा रातांधळेपाडा. फुगाळे, कोथळे, आपटे, पेंढरघोळ, माळ, विहिगांव, पळशीण, कळभोंडे, पेंढरी, नांदगांव आदी २४ गांवे व ११० पाड्यांमधील ४९ हजार ९६ ग्रामस्थांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. 

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे