मुंब्रा :आठ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्याची निर्घृणपणे हत्या करून मृतदेह डोंगरामधील झाडांमध्ये फेकून देणा-या नराधमास मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे.येथील श्रीलंका भागातील देवरीपाडा परिसरात राहणा-या ८ वर्षांच्या इरफानला सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अब्दुल हाफिज हा डोंगरावर घेऊन गेला. तेथे त्याने त्याच्यावर अत्याचार केला. ही बाब घरच्यांना सांगणार असल्याचे इरफानने सांगताच संतप्त झालेल्या हाफिजने प्रथम गळा दाबून त्याची हत्या केली. नंतर, त्याच्या चेहºयावर दगडाने प्रहार करून हातपाय बांधून मृतदेह झाडांमध्ये फेकून पलायन केले. नंतर, काही घडलेच नसल्याच्या आविर्भावात तो घरी आला. इकडे दुपारपासून घरी न आलेल्या इरफानच्या पालकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु, कुठेही त्याचा ठावठिकाणा न लागल्याने त्यांनी तो हरवला असल्याची तक्र ार पोलीस ठाण्यात दाखल केली. त्याचा शोध सुरू असतानाच त्याला सोमवारी हाफिजबरोबर पाहिल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यामुळे हाफिज याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. तसेच त्याने दाखवलेल्या जागेत वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या उपस्थितीत बुधवारी इरफानचा शोध घेतला. परंतु, तेथे त्याचा ठावठिकाणा लागला नाही.मात्र, त्यानंतर श्वानाच्या मदतीने येथील परिसर पिंजून काढणाºया पोलिसांना डोंगरांमध्ये झाडांमध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत इरफानचा मृतदेह गुरु वारी आढळला.यामुळे पोलिसांनी हाफिजला अटक केली असून न्यायालयाने तपासासाठी त्याला २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वपोनिकिशोर पासलकर यांनी लोकमतला दिली.शववाहिकेवर दगडफेक-शवविच्छेदनासाठी मृतदेह घेऊन जाणाºया शववाहिकेवर स्थानिकांनी दगडफेक केली. तसेच हत्या करणाºयाला ताब्यात देण्याची मागणी केली. यामुळे गुरु वारी काही काळ तेथे तणावसदृश परिस्थिती होती. अहवालानंतर इरफानवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले.
लैंगिक अत्याचार करून हत्या, मुंब्य्रातील घटना : एकास अटक; निर्घृणपणे मारून फेकले झाडांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 2:35 AM