लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नोकरीचे आणि पैशांचे आमिष दाखवून गरजू महिलांकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करून घेणा-या विनय सिंग (३०, रा. सावरकरनगर, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्याच्या तावडीतून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.कापूरबावडीनाका, भिवंडी रोड, ठाणे येथील एका बारच्या वरील भागात विनय आणि त्याचा साथीदार दया हे दोघे संगनमताने गरीब, गरजू महिलांना नोकरीचे आणि पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करून घेत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. तिच्या आधारे उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर आणि उपनिरीक्षक कल्याणी पाटील यांच्या पथकाने १४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास ‘स्पाइस मंत्रा मल्टिक्युसिन वाइन अॅण्ड डाइन, स्वागत रेस्टॉरंट अॅण्ड बार’च्या वरील एका खोलीत धाड टाकली. त्यावेळी तीन पीडित महिलांकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करण्यात येत असल्याचे आढळले. याप्रकरणी विनय आणि दया या दोघांविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंधक) अधिनियमानुसार कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यापैकी विनयला गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली, तर दया मात्र पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाण्यात नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 8:58 PM
नोकरीच्या अमिषाने गरजू महिलांना शरिर विक्रयास लावणाऱ्या विनय सिंग याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. त्याच्या अन्य साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाईतीन महिलांची सुटकाएकास अटक