ठाणे महानगरपालिका सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाचे दिवा भाजपाने घातले श्राद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 02:36 PM2018-01-18T14:36:23+5:302018-01-18T17:26:18+5:30
दिवा शहरातील समस्यांबाबत सत्ताधारी शिवसेना उदासीन असल्याचा आरोप करत रस्त्यांच्या कामात होणाऱ्या दिरंगाईमुळे नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता दिवा भाजपने श्राद्ध घालून निषेध केला.
ठाणे: दिवा शहरातील समस्यांबाबत सत्ताधारी शिवसेना उदासीन असल्याचा आरोप करत रस्त्यांच्या कामात होणाऱ्या दिरंगाईमुळे नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता दिवा भाजपने श्राद्ध घालून निषेध केला.यावेळी भाजपचे दिवा सरचिटणीस रोहिदास मुंडे,अंकुश मढवी,नरेश कदम यांनी मुंडन करून मुंब्रा देवी कॉलनी रोडच्या कामात अनियमितता असल्याचा आरोप केला.
मुंब्रा देवी कॉलनी रोडसाठी सुमारे 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या रस्त्याचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यात आले आहे.तीन महिने उलटले तरी 10 टक्के काम ही झालेले नाही.मागील पाच वर्षे हा रस्ता अक्षरशः गटार झालेले आहे.असे असताना सदर रस्ता तातडीने होणे गरजेचे आहे.निधी मंजूर आहे,वर्क ऑर्डर मिळाली आहे तरी कामात वेळ काढला जात असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.जे गटारांची कामे सुरू आहेत त्यात फाउंडेशन टाकले जात नाही.परिणामी पावसाळ्या त गटारे भरण्याचा धोका आहे.अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू असताना सत्ताधारी मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने दिवा भाजपच्या वतीने कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड,ऍड.आदेश भगत,रोहिदास मुंडे, निलेश पाटील,रोशन भगत,अंकुश मढवी, नरेश कदम,सचिन भोईर,गणेश भगत आदी नी मुंब्रा देवी कॉलनी येथे रस्त्याचे काम ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सुरू आहे तेथे ठामपा सत्ताधारी व प्रशासनाच्या नावाने श्राद्ध घालत मुंडन केले.
दिवा शहरात सत्ताधाऱ्यांची मनमानी असून नागरिकांचे हित लक्षात न घेता केवळ टेंडर साठी कामे केली जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.गणेश नगर भागातील खड्डे अद्याप भरण्यात आले नसून या रस्त्याच्या कामाला सुरुवात कधी करणार असा सवाल भाजपने केला आहे.2019 च्या निवडणुकीसाठी सत्ताधारी शिवसेना दिव्यातील गरीब नागरिकांना वेठीस धरत असून जाणीव पूर्वक संथ गतीने कामे केली जात असल्याचा आरोप रोहिदास मुंडे यांनी केला आहे.मे महिन्याच्या आत सर्व रस्त्याची कामे पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे कल्याण ग्रामीणचे नेते शिवाजी आव्हाड यांनी दिला आहे.दिव्यतील सर्व मुख्य रस्त्याची कामे पावसाळ्या पूर्वी करा अशी मागणी ऍड आदेश भगत यांनी केली आहे. शौचालय घोटाळा, नाना नानी पार्क घोटाळा,पाणी घोटाळा यासारख्या अनेक विषयांवर सत्यधारी शिवसेनेला लक्ष करत भाजपने हे आंदोलन केले आहे.एकंदरीत दिवा भाजप आता विकास कामांच्या मुद्द्यावर आक्रमक झाली असून.शिवसेनेच्या कामांवर पहारेकरी म्हणून भूमिका बजावणार असल्याचे पाहायला मिळत आहे.