लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बोगस कॉल सेंटर प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सागर उर्फ शॅगी ठक्करच्या एका साथीदारास ठाणे पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली. अमेरिकन नागरिकांकडून खंडणी वसूल करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती.करबुडव्या अमेरिकन नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या मीरा रोडवरील बोगस कॉल सेंटर्सचा ठाणे पोलिसांनी आॅक्टोबर २0१६ मध्ये पर्दाफाश केला. यातील मुख्य सूत्रधार शॅगी न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या चौकशीदरम्यान पोलिसांना त्याच्या काही साथीदारांची माहिती मिळाली होती. त्याआधारे आशिष चौधरीला दिल्लीतून अटक करण्यात आली. चौधरी हा अमेरिकेच्या इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिसेसच्या नावाने अमेरिकन नागरिकांना कारवाईचा धाक दाखवायचा. पीडित व्यक्ती तडजोडीस तयार झाली की, तिला ठरलेल्या रकमेचे आयट्यून गीफ्ट कार्ड विकत घेण्यास सांगितले जायचे. अमेरिकेतील पीडित व्यक्तीकडून आयट्यून गीफ्ट कार्डवरील सोळा अंकांचा क्रमांक घेऊन, त्याआधारे कार्ड भारतात कॅश करण्याची जबाबदारी चौधरीवर होती. या गुन्ह्यातून मिळणारा पैसा वळवण्यासाठी शॅगीची अनेक बँकांमध्ये खाती होती. त्याचे एक बँक खाते चीनमध्येही होते. या बँक खात्याची माहिती आशिषकडून मिळण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
शॅगीच्या साथीदारास दिल्लीतून अटक
By admin | Published: May 24, 2017 3:01 AM