शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

शहाड उड्डाणपुलावर वाहतूककोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 11:44 PM

शाळेच्या स्कूलबस, व्हॅन, विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा तसेच अन्य प्रवासी अडकून पडल्याने त्यांचे अतोनात हाल झाले.

म्हारळ : कल्याण-मुरबाड मार्गावरील शहाड उड्डाणपुलावर पडलेले खड्डे आणि बेशिस्त वाहनचालकांनी ओव्हरटेकिंगचा केलेला प्रयत्न, यामुळे गुरुवारी मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. त्यात शाळेच्या स्कूलबस, व्हॅन, विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा तसेच अन्य प्रवासी अडकून पडल्याने त्यांचे अतोनात हाल झाले.कल्याणहून मुरबाड तर, पुढे नगरकडे तसेच उल्हासनगर येथे जाण्यासाठी शहाड येथील उड्डाणपूल ओलांडावा लागतो. उल्हासनगरला जाणाºया वाहनचालकांना पुलावरून उतरल्यानंतर पुलाखाली ‘यू’ टर्न घ्यावा लागतो. तर, उल्हासनगरहून कल्याणला जाणाºया वाहनांनाही पुलाखालून आल्यानंतर ‘यू’टर्न घेऊन पुलावर चढावे लागते. कल्याण-मुरबाडदरम्यान येजा करणारी वाहने सरळ येतात. मात्र, उल्हासनगरला येजा करणारे सिमेंट मिक्सर, डम्पर यासारख्या अवजड वाहनांना वळण घेणे अवघड होते. त्यातच, बेशिस्त दुचाकीस्वार, रिक्षाचालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवतात. अनेकदा ही वाहने ओव्हरटेकिंगचा प्रयत्न करतात. शिवाय, विरुद्ध दिशेनेही वाहने येतात. ही कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ येते.कोंडीचा सर्वाधिक फटका शहाड, बिर्लागेट, म्हारळ रोडवरील शाळांतील विद्यार्थ्यांना बसतो. स्कूलबस, व्हॅन, रिक्षा त्यात तासन्तास अडकून पडतात. परिणामी, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होतात. भूकतहान लागल्यामुळे अनेकदा विद्यार्थी रडकुंडीला येतात. लघुशंकेमुळेही ते त्रासून जातात. कल्याण-मुरबाड-नगर या लांब पल्ल्याच्या एसटी, खाजगी जीपमध्येही प्रवासी अडकून पडतात. नोकरी, व्यवसायानिमित्ताने या रस्त्याने येजा करणाºयांनाही अनेकदा लेटमार्कला सामोरे जावे लागते.कल्याण पूर्वेतील गुरुकुल शाळेची बस गुरुवारी उल्हासनगर, शहाड पूलमार्गे कल्याणला दोन तासांनी आल्याचे चालक किशोर माळी यांनी सांगितले. पश्चिमेला जोडणाºया तीनही पुलांवर झालेल्या कोंडीमुळे आमचे हाल झाल्याचे माळी म्हणाले.शहाड उड्डाणपुलावर वाहनांच्या एका रांगेऐवजी पाचपाच रांगा लागत आहेत. तसेच पुलावरील खड्डे आणि ओव्हरटेकिंगमुळे कोंडी होत आहे.- कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उल्हासनगरअन्य परिसरातही रांगाबाईच्या पुतळ्याजवळील उड्डाणपुलावरही गुरु वारी प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. तेथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुलापासून सिंडिकेटपर्यंतचा रस्ताही जॅम झाला होता.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक