सदानंद नाईक, उल्हासनगर: शहर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या संकल्पनातून नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी शहाड फाटक उड्डाणपुलाची सामाजिक संस्थेकडून रंगरंगोटी करून सुशोभीकरण केले. रात्रीच्या वेळी उड्डाणपूल रंगेबेरंगी दिव्यानी उजल्याने, परिसराला वेळीच रंगत आली आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त पदी अजीज शेख यांची नियुक्ती झाल्यानंतर, त्यांनी विविध उपक्रम राबविण्यास सुरवात केली. स्वच्छ भारत अभियाना खाली महापालिकेचा भुयारी गटार साफ करणाऱ्यां रॉबर्टला राज्य शासनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या शोभायात्रेत स्थान मिळाले. तसेच राज्यात रॉबर्टद्वारे भुयारी गटार साफ करण्याचा प्रयोग करणारी राज्यात पहिली महापालिका ठरली. तर गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उदघाटन व लोकार्पण झाले.
यामध्ये आरोग्य विभागाच्या सर्वाधिक कचरा गाड्याचा समावेश होता. दरम्यान शहाड फाटक येथील अडगळीत पडलेल्या उड्डाणपूलाची रंगरंगोटी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सामाजिक संस्था व कंपन्यांकडून मोफत करून रंगीबेरंगी रोषणाई केली. त्यामुळे रात्रीच्या वेळी पूल उजाळून निघाल्याचे चित्र आहे.
शहरातील शहाड फाटक उड्डाणपूला प्रमाणे मुख्य रस्त्या लगतच्या सार्वजनिक व खाजगी भीती, शौचालय, इमारती आदींचीही सामाजिक संस्था व खाजगी कंपनी, शाळेतील मुलांकडून मोफत करण्यात येणार असल्याची माहिती नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी दिली. महापालिकेची आर्थिकस्थिती डबघाईला आली असताना बांधकाम परवान्यांतून तब्बल ५५ कोटीचे उत्पन्न मुळे यांनी मिळवून दिले होते. यावर्षीही लक्षणीय उत्पन्न मिळवून देणार असल्याचे संकेत मुळे यांनी दिले. दरम्यान ऑफलाईन ऐवजी ऑनलाइन बांधकाम परवाना पद्धत सुरू झाल्यावर, बांधकाम परवाना देण्यास अडथळे निर्माण झाला होता. मात्र पुन्हा शासनाने ऑफलाईन बांधकाम परवाना देण्यास मंजुरी दिल्याने, नगररचनाकार विभागाचे उत्पन्न वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.