- वसंत पानसरेकिन्हवली - ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी तालुका असणाऱ्या शहापूर तालुक्यातील आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली असून उपचारासाठी येणा-या रूग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले शहापूर उपजिल्हा रूग्णालयात तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील नागरिक उपचारासाठी येत असतात. त्यांना डॉक्टर व पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कारण देत आपले हात वर करत पुढील उपचारासाठी पुढे पाठविले जाते.शहापूरमध्ये असलेले पूर्वीचे ग्रामीण रु ग्णालय काही वर्षांपूर्वी उपजिल्हा नावाने नव्याने सुरु करण्यात आले. यासाठी १०० खाटांचे असलेल्या या रूग्णालयात कायमस्वरूपी तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा असते. आज या रूग्णालयाचा गाडा फक्त सहा डॉक्टर हाकत आहेत. पण उपजिल्हा रु ग्णालयात आजमितीस स्त्रीरोग तज्ज्ञ नाहीत. यामुळे प्रसूतीच्या काळात काही गंभीर परिस्थिती उद्भवली तर कल्याण - ठाणे येथे या रु ग्णांना हलवावे लागते. बालरोग तज्ज्ञ नसल्याने बाळांच्या प्रकृतीची हेळसांड होत आहे.हाडरोग तज्ज्ञ कधी रजेवर असतात त्यामुळे गंभीर रु ग्णाला खाजगी ठिकाणी हलवावे लागते. १०८ रूग्णवाहिकाची सुविधा ढेपाळल्यामुळे रूग्णांना खाजगी रूग्णवाहिका करावी लागते. सोनोग्राफीसारखीअद्ययावत मशीन आणलेली असून तिला चालवण्यासाठी तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने तेही बंद आहे. हीच परिस्थिती सिटी स्कॅन मशीनची आहे.१०८ रूग्णवाहिकेचा प्रश्न ऐरणीवर२२ नोव्हेंबरला शहापूर तालुक्यातील कृष्णाचीवाडी येथील आर्यन पांडुरंग पारधी या एक वर्षाच्या मुलावर बालरोग तज्ज्ञ नसल्याने योग्य उपचार न झाल्याने त्यांना ठाणे येथील सिव्हील रूग्णालयात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. रूग्णाच्या वडिलांनी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची मागणी केली.परंतु सध्या उपलब्ध नसल्याचे कारण देत येथील कर्मचारी यांनी खाजगी रु ग्णवाहिकामधून जाण्यास सांगितले. जवळ पैसे नसतानाही त्याच्या पालकांनी आर्यनला खाजगी रु ग्णालयात दाखल केले.त्यावेळी या रु ग्णवाहिकाचा प्रश्न उपस्थित झाला.शिस्त, स्वच्छतेत फरक पडलाडॉ. बनसोडे यांनी रु ग्णालय अधीक्षकांचा चार्ज स्वीकारला. अतिशय गलिच्छ असलेल्या रूग्णालयात स्वछता आणि शिस्त या दोन गोष्टीवर भर देत त्यांनी मोठ्या प्रमाणात सुधारणा केली आहे.शहरी भागातून ग्रामीण भागात डॉक्टर यायला तयार होत नाहीत. इतर सर्व पदे आम्ही भरली आहेत. कायम डॉक्टर मिळत नसल्याने गंभीर रूग्णाला ठाण्याला पाठवतो. लहान मुलांची शस्त्रक्रिया शहापूरमध्ये होते.- डॉ. कैलास पवार, वैद्यकीय अधीक्षक
शहापूर उपजिल्हा रुग्णालयच सलाईनवर, डॉक्टरांअभावी रूग्णांची हेळसांड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 1:09 AM