लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: जमिनीच्या मोजणीमध्ये आलेला तीन गुंठे फरकाचा पंचनामा करुन देण्यासाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी करुन दोन हजारांची लाच स्वीकारणाºया शहापूर येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्या कार्यालयातील लिपीक पंडीत गोखणे (५२) याला ठाणेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी अटक केली. त्याला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायायालने दिले आहेत.शहापूर येथील ६० वर्षीय तक्र ारदाराची कवडास येथे जमीन आहे. याच जमिनीची कागदोपत्री मोजणी केली होती. मात्र, मशिनने केलेल्या मोजणीपेक्षा पेपरच्या मोजणीतील जमीन तीन गुंठे अधिक वाढल्याचे निदर्शनास आले होते. जमीन वाढल्याचा पंचनामा करून देण्यासाठी शहापूरच्या भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्या कार्यालयातील लिपीक गोखणे यांनी पाच हजारांच्या लाचेची मागणी २२ जून २०२१ रोजी केली होती. तडजोडीनंतर यासाठी दोन हजारांची रक्कम देण्याचे ठरले. दरम्यान, यासंदर्भात संबंधित तक्रारदाराने ठाणे एसीबीकडे तक्रार केली होती. ठाणे एसीबीने २६ जुलै रोजी याबाबत सापळाही लावला. त्यावेळी तक्रारदाराकडून दोन हजारांची लाच स्वीकारतांना गोखणे याला एसीबीच्या पथकाने २६ जुलै रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन हजारांची लाच स्वीकारणाऱ्या शहापूरच्या भूमी अभिलेख लिपीकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 9:44 PM
जमिनीच्या मोजणीमध्ये आलेला तीन गुंठे फरकाचा पंचनामा करुन देण्यासाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी करुन दोन हजारांची लाच स्वीकारणाºया शहापूर येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्या कार्यालयातील लिपीक पंडीत गोखणे (५२) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी अटक केली.
ठळक मुद्देठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईपाच हजारांची केली मागणी