शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

शहीद कौस्तुभ राणेंच्या वीरपत्नीस 11 लाखांचा धनादेश, वीरमातेची इच्छा वाचून तुम्हीही कराल 'सॅल्यूट'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 9:06 PM

काश्मीर सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना 7 ऑगस्ट रोजी शीतल नगरमध्ये राहणारे मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शहीद झाले होते.

मीरारोड (ठाणे) - मीरारोडचे शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च महापालिका करणार असून वीर पत्नीस महापालिकेच्या वतीने  11 लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. तसेच मीरारोड येथे शहीद राणेंचे हुतात्मा स्मारक उभारणार असून जॉगर्स पार्कला कौस्तुभ यांचे नाव देण्यात येणार आहे. शिवाय कौस्तुभ यांच्या आईच्या सूचनेप्रमाणे केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांसाठी पालिका अभ्यासिका सुरू करणार आहे. 

काश्मीर सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना 7 ऑगस्ट रोजी शीतल नगरमध्ये राहणारे मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शहीद झाले होते. नुकतीच महापौर डिंपल मेहता, आमदार नरेंद्र मेहता, आयुक्त बालाजी खतगावकर, उपमहापौर चंद्रकांत वैती, सभागृह नेते रोहिदास पाटील, विरोधीपक्ष नेते राजू भोईर, गटनेते हसमुख गेहलोत आदींनी राणे कुटुंबीयांची भेट घेऊन महापालिकेच्या वतीने शहीद पत्नी कनिका यांना 11 लाख रुपयांचा धनादेश दिला. आ.मेहतांच्या निधीतून मीरारोड रेल्वे स्थानक समोरील चौकात कौस्तुभ यांचे हुतात्मा स्मारक बांधणार व जॉगर्स पार्कला शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे नाव दिले जाणार आहे. यासाठी भूमिपूजन व नामकरणाचा कार्यक्रम करण्याचा दिवस आदी निश्चित करण्यात आला आहे. कौस्तुभ यांच्या अडीच वर्षाच्या अगस्त्य या मुलाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही महापालिका करणार आहे. कुटुंबाने सहमती दर्शवली तर कुटुंबातील एका सदस्याला पालिकेत नोकरी देणार आहे, असेही महापौरांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. 

वीरमातेची मागणी

यावेळी कौस्तुभ यांच्या आईने केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व अभ्यासिका सुरू करण्याची सूचना केली असता, येत्या महासभेत तसा प्रस्ताव देणार असल्याचे आयुक्त बालाजी खतगावकर यांनी सांगितले. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्याबद्दल मीरा भाईंदरच्या नागरिकांना सार्थ अभिमान असून महापालिकेच्या माध्यमातून त्यांच्या प्रति आंदरांजली अर्पण करण्याचा हा पालिकेचा लहानसा प्रयत्न असल्याचे आयुक्त म्हणाले. 

टॅग्स :Kaustubh Raneकौस्तुभ राणेSoldierसैनिकMartyrशहीद