ठाणे : शारीरिक अपंगत्वावर मात करून शहराच्या वाचन चळवळीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या, मनोरंजन वाचनालयाच्या संचालिका शैलजा वासुदेव बेडेकर यांचे २० जुलै रोजी रात्री ९.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, बहीण, भाचे, नातवंड असा परिवार आहे. विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी आणि स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. महेश बेडेकर यांच्या आत्या होत्या. जन्मतःच अपंग असलेल्या शैलजा यांनी मराठी आणि संस्कृत विषयात एम.ए. केले होते. १९८० साली त्यांनी अपंगांसाठी ‘स्वयंसिद्ध’ ही संस्था सुरू केली. जिद्द, चिकाटी आणि कामावरील निष्ठेमुळे केवळ कुटुंबीयच नव्हेतर, शहरातील हजारो नागरिकांचे प्रेम आणि आदर त्यांनी मिळविला होता. शेवटपर्यंत त्यांनी लिखाण व पुस्तक वाचनाची आवड जोपासली.
शैलजा बेडेकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:25 AM