ठाणे - कुर्ला टर्मिनन्स येथून निघालेली शालिमार एक्स्प्रेस ठाणे स्टेशन येऊन थांबली. या प्रवासा दरम्यान मद्यधूंद असलेल्या दोन सफाई कामगारांनी वेटिंग तिकीट असलेला व बाथरूम जवळील मोकळ्या जागेत बसलेल्या प्रवाशास दमदाटी करीत हुज्जत घातली. एवढेच नव्हे तर त्याची बँग हिसकवण्याचा ही प्रयत्न केला. ठाणे स्टेशन सोडल्यानंतरही या कामगारांची दमदाटी सुरूच होती.
ठाणे येथून रात्री सुमारे 10.15 वाजे दरम्यान ही गाडी सुटलेली असतानाही कामगारांची ही दहशत सुरूच होती.कल्याणला उतरण्यासाठी काही जण आधीच दरवाज्यात आले. त्यांना ही मनमानी लक्षात आली. भीती वाटणारा त्यांचा आवतार पाहून कोणी ही पुढे येऊन बोलण्यास तयार नव्हते. यावेळी काही जणांनी एकत्र येवून ही मनमानी थांबवण्याचा प्रयत्न केला. या कामगाराना पाहूम गडी माणसाना भीती वाटत होती. पण रात्री - बेरात्री बाथरूमला येणाऱ्या महिला प्रवाशांना देखील या मद्यधूंद कामगारांचा त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन बोगीतील टिसी मास्तरला हा प्रकार निदर्शनात आणून दिला. रेल्वेच्या लांबपल्याच्या गाड्यांमधील बाथरूम सपाईसाठी खाजगी क्वाँट्रँक्टरद्वारे सपाई कामगार ठेनले जात आहेत. पण तसे फारसे उपयुक्त ही ठरत नसलेल्या या कामगारांची दहशत मात्र जीव घेणी ठरत आहे. मद्यधूंद अवस्थेतील हे कामगार बोगीत रात्री बेरात्री कारण नसतानाही हिंडत असतात. त्यांच्यातील काही कर्मचारी गुन्हेगार प्रव्रतीचे असण्याची दाट शक्यता आहे. त्यांचे वर्तनही योग्य नसल्याचे आढळून येते. या मद्यधू्ंद अवस्थेतील कामगारांपासून महिला प्रवाशांच्या जीवावर बेतण्याचा अतिप्रसंग व चीजवस्तू लांबवण्याच्या दुर्घटना होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची अपेक्षा आहे. मंगळवारी रात्री कल्याण स्टेशन येईपर्यंत या कामगारांचा धुमाकूळ सुरूच होता. ते मोठमोठ्याने आवाजही करीत होते. ते कोणाचे ऐकूण ही घेत नव्हते. बोगी क्रमांक 4 मधील हा प्रकार टिसींच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर त्यांनी कामगारांच्या मँनेजरच्या लक्षात आणून दिले. पण त्यानंतर या कामगारांना उतरवून देणे अपेक्षित होते. पण या सारखी कारवाई न झाल्यावे व ते कामगार गाडीतच असल्याने संबंधीत प्रवाशास या कामगारांची भीती वाटत होती. प्रवासा दरम्यान त्यांच्याकडून त्रास होण्याची शक्यता या प्रवाशाकडून व्यक्त करण्यात येत होती.