ठाणे - जे विरोधी बाकावर बसूनही महाराष्ट्रासाठी काम करीत आहेत, त्यामुळे सहाजीकच त्यांना मी मुख्यमंत्री असल्याची भावना वाटणे गैर नसल्याचे सांगत, सध्याच्या मुख्यमंत्र्याकडे कोणतेच काम नाही, त्यांचे काम हे शरद पवार असल्याची टिका केंद्रीय पंचायतराजमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला आहे.
ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या ओबीसी जागर अभियानत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकावर जोरदार टिका केली. या सरकाराने ओबीसीचे राजकीय आरक्षण अद्यापही दिलेले नाही, मराठा समाज, धनगर समाजाला आरक्षण मिळालेले नाही. परंतु आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी केवळ केंद्राकडे बोट दाखविण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करीत असल्याची टिका देखील त्यांनी यावेळी केली. ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळावे यासाठी केंद्राने राज्याला अधिकार दिले असतांनाही आरक्षण देण्याऐवजी, शेतक:यांच्या समस्या सोडविण्यासाठी केवळ सरकार कसे टिकेल यासाठी प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. या महाविकास आघाडी सरकाराने सत्तेत आल्यापासून नुसता गोंधळ घातला आहे, तो गोंधळ सोडविण्यासाठी फडणवीस करीत असल्याने मागील तीन महिन्यापासून त्यांना मास्क लावण्यासाठी देखील वेळ नसल्याचे त्यांनी सांगितले.
एकूणच यापुढे कितीही पक्ष एकत्र आले, तरी देखील यापुढे महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार असून फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. फडणवीस यांच्या कार्यकाळात एमएमआरडीएकडून 145क् कोटींचा निधी ठाणो जिल्ह्यासाठी मिळाला होता. परंतु आताच्या महाविकास आघाडी सरकारकडून निधी दिला जात नसून त्यासाठी वारंवार खेटे घालावे लागत असल्याची टिका देखील त्यांनी केली. पेट्रोल आणि डिङोल यांच्या वाढीव दराबाबत देखील त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिका करतांना, पेट्रोल, डिङोलचे दर वाढले तर त्यासाठी केंद्राकडे बोट दाखविले जाते. मात्र क्रुड ऑईलचे दर वाढल्याने दर हे वाढत असतात, हे महाविकास आघाडी सरकाराला माहित नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. परंतु केवळ केंद्राकडे बोट दाखवायचे, परंतु चीनला बॉर्डर पासून दोन किमी मागे हटविले, पाकीस्तानमध्ये घुसुन देशाने ङोंडो फडकवला, ३७० कलम हटविले ही कामे दिसत नाहीत का? असा सवालही त्यांनी शेवटी केला.