ठाणे - दगडफेकीतील आरोपीसोबत फोटो एकट्या पवारांचे नाही तर संपूर्ण राज्यात जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या नेत्यांसोबत व्हायरल झालेले फोटो आहेत. शरद पवार हे मार्केट मध्ये एक नंबर आहेत. जेव्हा हेडलाईन्स हवी असते तेव्हा पवारांचे नाव घेतले जाते. तुमच्या आशीर्वाद प्रेमामध्ये ६ दशके हे नाव टिकून आहे. हे वास्तव सर्वांना माहीत आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व कॅबिनेट मंत्री यांनी आपली सगळी भांडण बाजूला ठेवून त्यांनी कॅबिनेटमध्ये आरक्षणावर चर्चा करावी. जे हक्काचे आहेत त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. मंत्री आहेत त्यांच्यावर जो अन्याय झाला आणि जे नंतर येऊन मंत्री झालेत ते बाहेर बोलण्यापेक्षा कॅबिनेट चर्चेसाठी असते तिथे बोलावे. सरकारमध्ये तुम्ही मंत्री आहात. सरकारमध्ये राहून प्रश्न सोडवायचे असतात त्याच्यासाठी आंदोलन आणि सभा जर मंत्री घ्यायला लागले तर मग हे सगळ अंदाधुंदी आहे असा टोला भुजबळांना लगावला.
ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या सत्यशोधक दिंडीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली.यावेळी त्यांनी ज्येष्ठ साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यांनी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ज्यांचे संस्कार आमच्या कुटुंबावर गेले अनेक वर्ष झाले आहेत. सत्यशोधक म्हणजे आमच्यासाठी आमच्या आजी शांताबाई आणि गोविंदराव पवार यांनी आमच्या कुटुंबाला जी दिशा दिली त्याच्यात हा विचार अनेक दशक आमच्या कुटुंबात आहेत. त्याचा नवीन उजाळा नवीन पिढीसाठी आज प्रज्ञा ताई करत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे आम्ही सगळ्या शिकलो. छत्रपतींचे आदर्श तर आहेच पण शाहू फुले आंबेडकरांचे जे संस्कार आमच्यावर झाले. सावित्री बईंमुळे आम्ही शिकलो, आज राज्यात देशात आम्ही शिकून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जबाबदारी घेत नेतृत्व करत आहोत असं त्यांनी म्हटलं.
तसेच सत्यशोधक म्हणजे आमची श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही. मला अस वाटत राज्यात सर्वात मोठं आव्हान आहे दुष्काळ आणि काल झालेली अतिवृष्टी आहे. राज्य सरकारने तातडीने केंद्र सरकारला संपर्क करायला हवा. आज मी पेपरमध्ये वाचले २६०० कोटींची मागणी केली आहे पण त्यापेक्षा जास्त नुकसान झालं आहे. शरद पवार केंद्रीय मंत्री असताना दुष्काळ किंवा अतिवृष्टी झाली तर तातडीने केंद्रातून टीम यायची.ती टीम लवकरात लवकर आली पाहिजे पाहणी केली पाहिजे आणि त्यांची नोंद झाली पाहिजे. दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.