ठाणे : संताजी-धनाजीप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना उठसूठ कमळ दिसू लागले आहे, असे टोला सहकार पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी ठाण्यात लगावला. ज्या ठिकाणी पवार यांनी मतदान केले तेथे कमळ हे चिन्ह नव्हते, असा माझा दावा असल्याचे त्यांनी शनिवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केला.येत्या १७ मे १९मे दरम्यान ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड ग्राउंड सोलापूर महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याची माहिती देण्यासाठी देशमुख हे ठाण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पवार हे गेली ५० वर्षे राजकारणात आहेत, त्यांना राजकारणातील सर्व गोष्टी न्यात आहेत.आता त्यांना विजय आणि पराजयाची चाहुल लागली असून पराभवाला सामोरे जाताना मशीन खराब आहे असे सांगून बटन दाबले तर कमळाला मत जाते, ते सांगत आहेत. पराभवाची पार्श्वभूमी ते तयार करत असावे,असेही देशमुख म्हणाले.दुष्काळाला समोरे जाताना,पाणी,चारा आणि रोजगार हे तीन विषय महत्त्वाचे आहेत. त्यातच दुष्काळ निधी हा पोहोचला आहे. काही ठिकाणी खाते नंबर चुकीचे दिले गेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी खाते नंबर अचुक द्यावेत असे आवाहन ही त्यांनी केले.या पत्रकार परिषदेला सोलापूर सोशल फाउंडेशनचे अभिजीत पाटील, इंद्रजीत निंबाळकर, बाळासाहेब निंबाळकर,भूषण कुलकर्णी आदी उपस्थित होते.ठाणेकरांनी सोलापुरात यावेपोट भरण्यासाठी बºयापैकी सोलापूरवासीय ठाण्यात आले आहेत. ज्यांना उद्योग टाकायचे असेल अशा ठाणेकरांनी सोलापुरात यावे आवाहन करून तेथे जमिन दिली जाईल असेही त्यांनी सांगितले. ठाण्यात वृक्षलागवड अवघी २ टक्के आहे. त्यामुळे तेथील वातावरण गरम असून उलट सोलापूर थंड आहे.विठ्ठलाचे घडणार दर्शनठाण्यातील महोत्सवात पंढरपूरच्या विठुरायासह स्वामी समर्थ, कोल्हापूर महालक्ष्मी यामंदीरांसह आदी मंदीर उभारण्यात येणार आहे. तसेच १२० स्टॉल,आर्ट गॅलरी, धार्मिक होम आदी महोत्सवात असणार आहेत. या वेळी नवरत्न पुरस्कार ही देण्यात येणार असून या महोत्सवाचे उद्घाटन ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचे फाऊंडेशनने सांगितले.
शरद पवार यांना आता उठसूठ कमळच दिसतेय - सुभाष देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 12:02 AM