शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

शीळ-कल्याण मार्गाचा मेकओव्हर!

By admin | Published: October 04, 2016 2:27 AM

ठाणे ते शीळ मुंब्रा मार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीतून आता वाहनचालकांची लवकरच सुटका होणार आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली ते मुंब्रा दरम्यान

ठाणे : ठाणे ते शीळ मुंब्रा मार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीतून आता वाहनचालकांची लवकरच सुटका होणार आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली ते मुंब्रा दरम्यान पारसिकडोंगरातून भूयारी मार्ग आणि पुढे एलिव्हेटेड मार्गही एमएमआरडीने प्रस्तावित केला आहे. यासाठी सुमारे ३७४ कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे. तर शीळ फाटा जंक्शन ते कल्याण फाटा जंक्शनपर्यंतच्या रस्त्याचेही रुंदीकरणासह मजबुतीकरण करण्यात येणार असून यासाठी ७८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण कामांच्या निविदा काढल्या असून २०१९ पर्यंत ती पूर्ण होतील असा अंदाज बांधण्यात आला आहे. शिवाय याकामात अडथळा ठरणाऱ्या मुंब्रा बायपास रोडवरील वीजवाहिन्या बदलण्यासाठी आणि ट्रान्सफर्मा उभारण्यासाठी ८ कोटी ६७ लाखाची निविदा काढली आहे. एकूणच आता या भागासाठी तब्बल ४६० कोटींचे हे जम्बो काम येत्या काळात मार्गी लागणार आहे. ठाणे ते शीळ तसेच मुंब्रा मार्गावर होणारी वाहतूककोंडी तसेच नवी मुंबईकडून शीळ मार्गावरही वाहन चालकांना ताटकळत राहावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या मार्गावर भुयारी मार्ग असावा, अशी मागणी आमदार सुभाष भोईर यांनी केली होती. दरम्यान, मुंब्रा-ऐरोली भुयारी मार्गातून पुढे बेलापूरपर्यंत जाता येणार आहे. या कामांचे एमएमआरडीएने नुकतेच टेंडरही प्रसिद्ध केले असून पुढील ४० महिन्यात २०१९ मध्ये काटई-मुंब्रा-ऐरोली असा हा रस्ता ठाणे-शीळ मुंब्रा या महाभयंकर वाहतूक कोंडीवर उतारा ठरणार आहे. तो चारपदरी असणार आहे. या रस्त्यांच्या मार्गात भारत गिअर कंपनी, वनखाते आणि थोडेफार नागरीकरण असे तिहेरी अडथळे होते. त्यापैकी वनखात्याच्या बाधीत जमिनी एवढी जमीन वनीकरणासाठी देण्याची मंजुरी मिळाल्यामुळे वनखात्याचा मोठा अडसर संपला आहे. तर भारत गिअर कंपनीची जमीन वर्ग करण्याची प्रक्रि या ठामपाने सुरू केली असून संयुक्तपणे एमआयडीसीच्या बाधीत जमीन आराखड्यावरदेखील शासनाच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. आता ही प्रक्रि या केवळ निविदा उघडण्याच्या प्रतिक्षेत असून लवकरच या रस्त्याचे काम सुरू होईल, अशी माहिती भोईर यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)