शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

अन्यथा तुमची शुगर वाढविल्याशिवाय गप्प बसणार नाही: तानाजी सावंतांनी दिला विरोधकांना इशारा

By अजित मांडके | Published: April 22, 2023 4:57 PM

मागील काही महिन्यापूर्वी हापकीनच्या मुद्यावरुन तानाजी सावंत यांची खिल्ली उडविण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: हापकीन वरुन मला डिवचले जात आहे. मात्र इलेक्ट्रील इंजिनिअर, शुगरमध्ये पीएचडी केलेली आहे, आणि मी स्वत: रिसर्चर आहे. त्यामुळे मला डिवचू नका अन्यथा तुमची शुगर वाढविल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराच राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विरोधकांना दिला आहे.

मागील काही महिन्यापूर्वी हापकीनच्या मुद्यावरुन तानाजी सावंत यांची खिल्ली उडविण्यात आली होती. त्याचा समाचार शनिवारी त्यांनी ठाण्यातील सुपर स्पेशालीटी हॉस्पीटलच्या भुमीपुजनाच्या निमित्ताने घेतला. १९८६ मध्ये इलेक्ट्रीक इंजिनिअरींगमध्ये गोल्ड मीडल मिळविले आहे. त्यानंतर लेक्चरर म्हणून काम केले. पुढे पूण्यात २००१ पासून १०० इस्टंट्युट चालवत आहे. २००८ मध्ये पहिला साखर कारखाना काढला. त्यानंतर त्याचे ८ कारखाने झाले आहेत. मी मेहनतीवर साखर कारखाने उभे केले आहेत, कोणाकडून विकत घेतले नसल्याचे सांगत त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टिका केली. मी रिर्सचस असल्याने आता आरोग्य विषयाचे प्राधिकरण तयार करीत आहेत. येत्या १० दिवसात ते प्राधिकरण अस्तिवात येईल असेही ते म्हणाले.

येत्या काळात महाराष्ट्रात हेल्थकार्ड उपलब्ध करुन दिले जाणार आहे. जिल्हा रुग्णालयाचे काम हे १८ महिन्यात पूर्ण झाले पाहिजे. असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी मी वेगळ्या पध्दतीने काम करीत असून प्रत्येक महिन्याचा कामकाजाचा डेटा मी घेणार आहे. त्यामुळे वेळेत काम करण्याची तंबीच त्यांनी यावेळी दिली. कोरोना वाढत असला तरी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले परंतु आजार अंगावर काढू नका असेही त्यांनी सांगितले. टाक्सफोर्सची शुक्रवारी बैठक घेण्यात आली असून १५ मे पर्यंत कोरोना ओसरलेला दिसेल असेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु कोरोना वाढतो म्हणून आम्ही लगेच लॉकडाऊन करणार नाही, आधीचे सरकार असते तर त्यांनी लगेच लॉकडाऊन केला असता असा टोलाही त्यांनी लगावला.

कपील पाटील - ग्रामीण भागात कोणीही डॉक्टर टिकत नाही. इंटनशीप झाली की लगेच निघून जातात. एकीकडे विकास सुरु आहे. तर ग्रामीणमध्ये सुविधा नसल्याचे दिसत आहे. बदलापुरचे रुग्णालय १०० बेडचे करावे, शहापुर उपजिल्हा रुग्णालय करावे, खर्डी येथे ट्रॉमा सेंटर सुरु करावे, सुपरस्पेशलीटी हॉस्पीटल असे निर्माण करावे की एकाही रुग्णाला मुंबईला जाण्याची वेळ येऊ नये अशी मागणी केंद्रीय पचांयत राजमंत्री कपील पाटील यांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :thaneठाणेTanaji Sawantतानाजी सावंत