- अजित मांडकेठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात असलेल्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे यांना तब्बल एक लाख ३० हजारांचे मताधिक्य मिळाले आहे, तर राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना अवघी ४० हजार ९६७ मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेच्या मतांमध्ये यंदा २० हजार ६६१ मतांची निर्णायक वाढ झाली आहे. गेल्या वेळेस एक लाख नऊ हजार ३३९ मते मिळाली होती.ठाण्याप्रमाणेच कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. तो विधानसभेतही अभेद्य राहणार असल्याचेच स्पष्ट झाले आहे.कोपरी-पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघात युतीच्या नगरसेवकांची संख्या ३६ असून राष्टÑवादीचा येथे भोपळा आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या कालावधीत राष्टÑवादीच्या विद्यमान नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस आणि राष्टÑवादीला येथे मोठे आव्हान उभे केले आहे. तर, या मतदारसंघात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकछत्री अंमल असल्याने विचारेंना त्याचा फायदा झाल्याचे या निवडणुकीत दिसून आले. मागील निवडणुकीत विचारे यांना मोदीलाटेमुळे पाच लाख ९५ हजार ३६४ मते मिळाली होती, तर राष्टÑवादीचे संजीव नाईक यांना तीन लाख १४ हजार ६५ मते मिळाली होती. यामध्ये कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात तर नाईक यांना ४० हजार ९३३ मते मिळाली होती. या निवडणुकीत आनंद परांजपे यांना या मतदारसंघात अवघ्या ३० मतांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर, तिकडे शिवसेनेचे विचारे यांच्या मताधिक्यामध्ये तब्बल २० हजार मतांची भर या निवडणुकीत पडल्याचे दिसले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मल्लिकार्जुन पुजारी यांना या मतदारसंघातून सहा हजार ८२२ मते मिळाली आहेत; परंतु त्याचा फार काहीच परिणाम शिवसेनेच्या मतांवर झालेला नाही.मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना झाला होता; परंतु आता युती झाली असल्याने त्याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेलाच होईल, असे दिसत आहे. त्यात, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे हे या मतदारसंघात येत असले, तरी त्यांची ताकद मात्र नाही. या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्टÑवादीचे अस्तित्व मतांमध्ये दिसत असले, तरी नगरसेवकांची संख्या मात्र शून्य आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार शोधण्यापासून काँग्रेसला सुरुवात करावी लागणार आहे.>या विधानसभा मतदारसंघात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकछत्री अंमल आहे. त्यांचा शब्द हा कार्यकर्त्यांसाठी काळ्या दगडावरची रेघ मानली जातो. त्यामुळे मतदारांनी विचारे यांनाच साथ दिली.>या पट्ट्यात सिंधी मतदारसुद्धा निर्णायक भूमिकेत आहे. त्यातच, काही सिंधी नगरसेवकांनी आधीच शिवसेना आणि भाजपची कास धरली आहे.एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच या पट्ट्यात विधानपरिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांचीसुद्धा तितकीच ताकदआहे. तीही या निवडणुकीत कामाला आल्याचे दिसून आले.>विधानसभेवर काय परिणामलोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मतांमध्ये तब्बल २० हजार मतांची वाढ झाल्याने त्याचा फायदा हा शिवसेनेलाच होणार आहे. मात्र, दुसरीकडे राष्टÑवादीच्या मतांमध्ये अवघ्या ३० मतांची वाढ झाली आहे. त्यात, आता विधानसभा निवडणुकासुद्धाशिवसेना आणि भाजप हे युतीत लढणारअसल्याने साहजिकच एकनाथ शिंदे यांच्या मताधिक्यात वाढ होणार असून हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहील, असे चित्र आहे.
कोपरी-पाचपाखाडीत शिंदेंचा एकछत्री अंमल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 11:31 PM