बदलापूर : शिवसेनेमधील अंतर्गत वाद उफाळला असून शिवसैनिकांनीच नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.
बदलापूरातील शिवसेनेचे नगरसेवक शैलेश वडनेरे आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यातील वाद आता पक्षाच्या चिंतेत वाढ करणारा ठरला आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेआधी वामन म्हात्रे आणि नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्यात वादावादी झाली होती. त्या वादाचे पडसाद सभा संपल्यानंतर उमटले.
या प्रकारानंतर शैलेश वडनेरे यांनी शिवसैनिकांच्या विरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.