सदानंद नाईक, उल्हासनगर : शिवसेना शिंदे गटाची उल्हासनगर व अंबरनाथ शहर कार्यकारणी बरखास्त केल्यावर १८ व १९ जुलै रोजी इच्छुकांच्या मुलाखती खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अन्य नेते घेणार होते. मात्र, शिंदे यांना काम निघाल्याने २४ व २५ जुलै रोजी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली.
कल्याण लोकसभा निवडणुकीत उल्हासनगर व अंबरनाथ मधून खासदार श्रीकांत शिंदे यांना पाहिजे असलेले मताधिक्य न मिळाले नाही. असे कारण पुढे करून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी उल्हासनगर व अंबरनाथ येथील शिवसेना व महिला आघाडीची कार्यकारिणी अचानक बरखास्त केली. अशी चर्चा शहरात रंगली आहे. पक्षाच्या या निर्णयाने स्थानिक नेत्यात खळबळ उडाली. तर नवीन कार्यकारणी निवडीसाठी १८ व १९ जुलै रोजी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे ठरले होते. १८ जुलै रोजी अंबरनाथ मध्ये काही इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यावर, उर्वरित मुलाखती २४ जुलै रोजी घेण्याचे ठरले. तर उल्हासनगर मधील इच्छुकांच्या मुलाखती पुढे १९ ऐवजी २५ जुलै रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनीं दिली. दरम्यान उल्हासनगर शहरप्रमुख पदासाठी राजेंद्र चौधरी यांच्या नावाला स्थानिकांकडून पसंती मिळत आहे.
उल्हासनगर व अंबरनाथ शिवसेना कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्यावर, १८ जुलै रोजी अंबरनाथ मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. तर उर्वरित मुलाखती २४ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. या मुलाखती दरम्यान शहरप्रमुख अरविंद वाळेकर व आमदार बालाजी किणीकर यांच्यात पोस्टर्स युद्ध उडाले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत २५ जुलै रोजी कॅम्प नं-३,सी ब्लॉक येथील गुरुद्वार मध्ये उल्हासनगर मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांत अंबरनाथ प्रमाणे पोस्टर्स व वाद उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.