ठाणे : शिवसेनेकडून ठाणे आणिपालघर जिल्ह्यांकरीत शिवसेना महिला पदाधिका:यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुन्हा जुन्या महिलांना यात संधी दिल्याचे दिसून आले आहे. ठाण्यातून अनिता बिज्रे आणि माजी महापौर स्मिता इंदूलकर यांच्या खांद्यावर देखील महत्वाची जबाबदारी देण्यात आली. दरम्यान बुधवारी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या सर्वानी शिवसेनेचे पदाधिकारी केदार दिघे यांच्यासह शक्ती स्थळावर जाऊन आनंद दिघे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
या महिलांची निवड करीत शिवसेनेने पुन्हा जुन्या महिला पदाधिका:यांना मैदानात उतरविल्याचे दिसून आले आहे. ठाण्यातील अनिता बिज्रे या आनंद दिघे यांच्या जवळच्या मानल्या जात होत्या. परंतु काही वर्षापूर्वी त्यांच्याकडील महिला संघटनेची जबाबदारी काढून घेत, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या खांद्यावर ही धुरा सोपविण्यात आली होती. त्यामुळे बिज्रे विरुध्द शिंदे असा संघर्ष देखील पहावयास मिळाला होता. परंतु त्यानंतर बिज्रे या संघटनेतूनच काहीशा बाजूला पडल्याचे दिसून आले होते. तसेच माजी महापौर स्मिता इंदूलकर देखील मागील काही वर्षापासून राजकीय प्रवाहातून काहीशा बाहेर असल्याचेच दिसून आले होते.
दरम्यान मीनाक्षी शिंदे यांनी देखील शिंदे गटाला समर्थन दिल्याने पक्षाकडून त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. परंतु आता त्यांच्या जागी बिज्रे यांच्यावर विश्वास टाकत त्यांच्या खांद्यावर ठाणो आणि पालघर जिल्ह्याची संघटक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. समिधा मोहीते (विधानसभा ठाणो, ओवळा माजिवडा) रेखा खोपकर (कोपरी - पाचपाखाडी, मुंब्रा - कळवा), महेश्वरी तरे (उपजिल्हा संघटक), संपदा पांचाळ, आकांक्षा राणो यांचीही निवड करण्यात आली आहे. तर महिला शहर संघटकपदी स्मिता इंदूलकर (ठाणो विधानसभा), वासंती राऊत (ओवळा माजिवडा), प्रमिला भांगे (कोपरी - पाचपाखाडी) तर महिला उपशहर संघटक, महिला विभाग संघटक व महिला उपविभाग संघटक आदी पदावर देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी या महिला शिवसेनेत सक्रीय होत्या. मात्र मागील काही वर्षापासून या प्रवाहाच्या बाहेर फेकल्या गेल्या होत्या. परंतु आता मागील काही दिवसात घडलेल्या राजकीय स्थित्यंतरानंतर याच महिलांच्या खांद्यावर आता शिवसेनेने जबाबदारी टाकली आहे. दरम्यान या नवनियुक्त महिला पदाधिका:यांसह दिघे यांचे पुतणो केदार दिघे यांनी शक्तीस्थळावर जाऊन आनंद दिघे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. तसेच या सर्वाचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. हा सत्कार ख:या अर्थाने धर्मवीरांच्या विचारांचा असून धर्मवीरांच्या शिकविलेल्या निष्ठेचा देखील असल्याचे मत यावेळी केदार दिघे यांनी व्यक्त केले.