सदानंद नाईक
उल्हासनगर : कोरोनाच्या पाश्वभूमीवर कोरोनाचा प्रभावी सामना करण्यासाठी करावयाच्या उपाययोजने बाबत विशेष महासभेची मागणी उपमहापौर भगवान भालेराव यांनी महापौर लिलाबाई अशान यांनी केली. रेमडीसीविर इंजेक्शनचा तुटवडा, आरोग्य सुविधा बाबत चर्चा व उपाययोजना करण्यासाठी विशेष महासभेचे आयोजन केल्याची माहिती उपमहापौर भालेराव यांच्या समवेत भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी दिली.
उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेच्या शहर असल्याने, कोरोना प्रादुर्भाव पासून बचाव करण्यासाठी महापालिका पुढे सरसावली आहे. मात्र काही दिवसापासून आरोग्य सुविधा बाबत अनेकांनी प्रश्नचिन्हे उभे ठाकून रेमडीसीविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. कोरोनाचा प्रभावी सामना व उपाययोजना करण्यासाठी विशेष महासभा बोलावून चर्चा करण्याची मागणी उपमहापौर भगवान भालेराव, भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वावानी, माजी स्थायी समिती सभापती राजेश वधारीया, टोनी सिरवानी आदींनी एका निवेदनाद्वारे महापौर लिलाबाई अशान यांना केली. शिवसेना आघाडीतून बाहेर पडलेले उपमहापौर भगवान भालेराव सक्रिय झाल्याचे चित्र आहे. बहुतांश स्थानिक नेते, नगरसेवक कोरोना संसर्गाची भीतीने भूमिगत झाल्याने, भगवान भालेराव हे भाजपच्या नेत्यांना सोबत घेऊन आरोग्य सुविधेचा बाजू लावून धरली आहे.
महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी कोरोनातून बरे झाल्यावर, बुधवारी महापालिका सेवेत रुजू झाले. त्यांनी विभाग प्रमुखांच्या बैठका घेऊन महापालिका कोविड रुग्णालयाला भेट दिली. दरम्यान आयुक्त दयानिधी यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर सर्वस्तरातुन टीका होत आहे. तर काही वादग्रस्त अधिकाऱ्यांना जादा अधिकार दिल्याने, महापालिकेच्या अन्य अधिकाऱ्यात नाराजी निर्माण झाली. अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्या बाबत विशेष महासभेत चर्चा होणे गरजेचे असल्याचे मत उपमहापौर भगवान भालेराव यांनी व्यक्त केले. महापालिका अधिकाऱ्या बाबत अनेक तक्रारी असूनही अश्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्या ऐवजी त्यांना पाठीशी घातले जात असल्याने, महापालिका कारभारात गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाल्याचे मत भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी व्यक्त केले.
महासभेत शिवसेना सापडणार कोंडीत?
महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असून ऐन महापौर निवडणुकी पूर्वी भाजपातील ओमी टीमचे नगरसेवक शिवसेनेकडे गेल्याने, शिवसेना आघाडी सत्तेत आली. सद्यस्थितीत ओमी टीमचे नगरसेवक तटस्थ असून सत्ताधारी व शिवसेना आघाडीतील रिपाइं आठवले गटाचे शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव हे भाजप गोटात गेल्याने, भाजपचे पारडे जड झाले. एकूणच महापौर लिलाबाई अशान यांनी विशेष महासभा बोलविल्यास शिवसेनेची कोंडी होणार असल्याचे चित्र शहरात आहे.