भिवंडी : शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून टेंभवली गावातील माजी शाखाप्रमुखांसह शिवसैनिकांनी आठ दिवसांपूर्वी भाजपत जाहीर प्रवेश केल्याच ताजे असताना आता ग्रामीण भागातील शिवसैनिकांनी मंगळवारी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत हायवे-दिवे येथील निवासस्थानी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
शिवसैनिकांच्या या भाजप प्रवाशाने गावपातळीवर शिवसेनेला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. भाजपचे टेंभवली गाव नवनियुक्त शाखाध्यक्ष हरेश बाळाराम नांदूरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाप्रणित ‘राजे ग्रुप’चे योगेश बाबरे, यश बाबरे, तोशीब शेख, किरण बाबरे, यदुनाथ गोराडकर, साहिल पाटील, राजेश प्रीतम पाटील, मयूर (मुन्ना) पाटील, केशव मढवी, सुधीर गोराडकर, विक्रम गायकर, बाळाराम नांदूरकर, अक्षय बाबरे, राजू नांदूरकर, चिराग गोराडकर, नित्यानंद मढवी व अन्य शिवसैनिकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश करताच योगेश बाबरे यांची खारबांव-टेंभवली गण अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीवेळी भाजपचे जिल्हा सचिव प्रकाश पाटील, योगेश वसंत पाटील, तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्या कल्पना बाबरे, राजू बाबरे, दिगंबर पाटील, कुमार गोराडकर, ॲड. प्रवीण मढवी, नारायण गोकुळदास पाटील, सौरव घरत, आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.