शहरं
Join us  
Trending Stories
1
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
2
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
3
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
5
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
6
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
7
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
8
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
9
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
10
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
11
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
12
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
13
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
14
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
15
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
16
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
17
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
18
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
19
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
20
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी

उसाटने डम्पिंगवरून शिवसेना-भाजप आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:46 AM

उल्हासनगर : कॅम्प क्र. ५ खडी खदान येथील डम्पिंग ग्राउंड हटविण्याची मागणी शिवसेनेने महापालिका आयुक्तांना करून डम्पिंग न हटविल्यास ...

उल्हासनगर : कॅम्प क्र. ५ खडी खदान येथील डम्पिंग ग्राउंड हटविण्याची मागणी शिवसेनेने महापालिका आयुक्तांना करून डम्पिंग न हटविल्यास १७ ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पालिकेच्या प्रस्तावित उसाटने गाव हद्दीतील डम्पिंगला भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी विरोध केल्याने डम्पिंगवरून शिवसेना भाजप आमने-सामने आल्याचे चित्र आहे.

कचरा कॅम्प क्र. ५ येथील खडी खदान येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. डम्पिंग ग्राउंड ओव्हरफ्लो झाल्याने कचरा रस्त्यावर येत असल्याचा आरोप शिवसेनेचे पदाधिकारी दत्तू पोळके यांनी केला. डम्पिंग ग्राउंडवरील दुर्गंधीयुक्त सांडपाण्याशेजारील झोपडपट्टी भागात जाताे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. डम्पिंगला पर्यायी जागा मिळण्यासाठी पालिकेने शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर एमआयडीसीच्या ताब्यातील उसाटने गाव हद्दीतील ३० एकर जागा महापालिकेला हस्तांतरित केली. या जागेला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. आमदार गणपत गायकवाड हेही ग्रामस्थांच्या बाजूने उभे राहिल्याने पालिकेच्या पर्यायी डम्पिंगचे स्वप्न अधुरे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विभागप्रमुख दत्तू पोळके यांनी महापालिका आयुक्तांना लेखीपत्र देऊन खडी खदान डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी केली. १७ ऑगस्टपूर्वी डम्पिंग ग्राउंड उसाटने गाव हद्दीतील जागेवर हटविले नाही तर शिवसेना स्टाइलने आंदोलन करणार असल्याचा इशारा आयुक्तांना दिला. शासनाने महापालिकेला ३० एकर जागा देऊन पालिकेला हस्तांतरित केली. मात्र, महापालिका अधिकारी ती जागा ताब्यात घेण्यास असमर्थ ठरत असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला. पालिकेने गावकऱ्यांची बैठक घेऊन त्यांची समजूत काढायला हवी. त्या दृष्टीने प्रयत्न होत नसल्याचे चौधरी यांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात महापालिका अधिकारी पोलीस संरक्षणात जागा मोजणीसाठी गेले होते. मात्र, ग्रामस्थांनी जागा मोजणीला विरोध केला. तसेच आमदार गणपत गायकवाड यांनी डम्पिंग जागा शाळेजवळ असल्याचे सांगून विरोध केला. तसेच दुसरी पर्यायी जागा मागण्याचा सल्ला महापालिका अधिकाऱ्यांना दिला.