- सदानंद नाईक
उल्हासनगर : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना लोकल प्रवाशास शासनाने सवलत दिल्याने, रेल्वे पास घेण्यासाठी उल्हासनगर, शहाड, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन बाहेर नागरिकांनी रांगा लागल्या होत्या. लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिक सकाळी आले होते. तर शहरात लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या २६ हजार ५८६ झाली.
उल्हासनगर महापालिकेने नागरिकांना कोरोना लस देण्यासाठी सहा लसीकरण केंद्र उघडले आहे. ११ ऑगस्ट पर्यंत ८६ हजार २११ नागरिकांनी पहिला तर २६ हजार ५८६ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतल्याची माहिती डॉ सुनीता सफकाळे यांनी दिली. दरम्यान लसीचा दुसरा डोस घेऊन ज्यां नागरिकांना १५ दिवस झाले. अशांना लोकल प्रवास करण्यास मंजुरी देण्यात आली. उल्हासनगर, शहाड, विठ्ठलवाडी अश्या स्थानकाच्या बाहेर महापालिकेने कर्मचारी तैनात केले. कर्मचारी कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसचे प्रमाणपत्र बघियावर लोकल पास देण्यासाठी रेल्वे प्रशासनाला सुचवीत आहेत. नागरिकांनी दुसऱ्या डोसचे प्रमाणपत्र व आधारकार्ड दाखविल्यास, त्यांना लोकलने येण्या-जाण्यास लोकल पास देण्यात ये आहे. लोकल पास घ्यासाठी स्टेशनवर नागरिकांनी गर्दी केली होती.
महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी उल्हासनगर, शहाड, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवर जाऊन कोविड लसीचा दुसरा डोस प्रमाणपत्र, लोकल पास साठी देण्यात येणारी परवानगी आदींची पाहणी बुधवारी सकाळी केली. बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना उल्हासनगर स्टेशन मधून ६०, शहाड स्टेशन येथून ८० तर विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन येथून २५ जणांना लोकल पास दिल्याची माहिती उपयुक्तांनी दिली. तसेच महापालिकेचे कर्मचारी स्टेशन बाहेर नागरिकांच्या सेवेसाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. दरम्यान लसीकरण केंद्रावर जादा लस उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांची भेट घेऊन केली. पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांची लसीकरण केंद्रा बाहेर संख्या वाढली आहे.