लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यात कोरोना काळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केले असून सत्ताधारी शिवसेनेने फक्त दिखाव्याची भूमिका घेतली. दिवंगत नेते आनंद दिघे यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी शिवसेनेने संपविली आहे. दिघेंच्या कामांचा वसा भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यामुळे आगामी ठाणे महापालिका निवडणूकीत ठाणेकर भाजपला सहकार्य करून महापलिकेवर भाजपला झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केला. भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने कोपरी येथे सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचे आयोजन केले आहे. या कार्यक्र मात दरेकर आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सत्ताधारी शिवसेनेवर ही टीका केली.राज्यात सत्ता स्थापन कारण्यासाठी शिवसेनेने हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावरून उतरवला आहे. प्रत्येक वेळी राज्य सरकार म्हणून स्वत: काही करायचे नाही आणि केंद्र सरकारकडे नेहमी बोट दाखवायचे हेच उद्योग सध्या सुरु असल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली.कोपरीत सुरू असलेल्या अशा धार्मिक कार्यक्र मामुळे हिंदू धर्माची पताका जपण्याचे काम भाजप ठाण्यात करीत आहे. त्याचबरोबर आनंद दिघे यांच्या ठाण्यात शिवसेना कार्यकर्ते काम करताना दिसत नाही. कोरोना काळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गरजूंसाठी धावपळ करून समाजसेवा केली, दिघे यांच्या सामाजिक बांधिलकीची आणि त्यांच्या कामाचा खऱ्या अर्थाने भाजपच्या कार्यकर्त्यांनी वसा ठाण्यात उचललेला असल्याचा दावाही दरेकर यांनी यावेळी केला.पोलिसांच्या मागे चोर धावत असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केले होते. सरकार मध्ये असून पवार असे वक्तव्य करीत असल्याने हे दुर्दैव आहे. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था जोपासण्यात हे सरकार अपयशी आहे. पोलिसांना मनोबल आणि यंत्रणा वाढवली जात नाही, पोलिसांची आणि त्याचबरोबर सरकारची प्रतिमा मालिन होत आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली.
ठाण्यात आनंद दिघेंनी जपलेली सामाजिक बांधिलकी शिवसेनेने संपवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 3:43 PM
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यात कोरोना काळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केले असून सत्ताधारी शिवसेनेने फक्त दिखाव्याची भूमिका घेतली. ...
ठळक मुद्दे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे टीकास्त्रआगामी पालिका निवडणूकीत भाजपचाच झेंडा फडकणार