पंकज रोडेकरठाणे : निवडणूक कामात व्यस्त राहणाºया शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील १८ विधानसभेच्या निवडणुकीत केलेल्या टपाली मतदानापैकी ५२ टक्के मते महायुतीला प्राप्त झाली आहेत. त्यामध्ये शिवसेनेला भाजपपेक्षा दोन टक्के अधिक मतदान झाले आहे. एकूण झालेल्या ७ हजार २३६ टपाली मतदानांपैकी ३ हजार ७९९ मते महायुतीच्या पारड्यात गेली तर २१३ शासकीय कर्मचाºयांनी २१३ उमेदवारांना ‘नोटा’ करुन नाकारले आहे.
ठाणे जिल्ह्यातील निवडणुकीत भाजप,शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, वंचित आघाडी या प्रमुख पक्षांसह अपक्ष असे एकूण २१३ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. यावेळी मतदात्यांनी ठाणे जिल्ह्यात भाजपच्या आठ उमेदवारांना पुन्हा: एकदा विजयी केले. शिवसेना-५, राष्ट्रवादी -दोन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समाजवादी आणि अपक्ष यांचे प्रत्येकी एक-एक उमेदवार निवडून दिले आहेत. निवडणुकीच्या कामाकाजाला जुंपलेल्या शासकीय व निमशासकीय कर्मचाºयांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक विभागामार्फत यावेळीही टपाली मतदान प्रक्रिया राबवली गेली. जिल्ह्यातील १८ मतदारसंघांतील शासकीय नोकरदार वर्गाने पहिली पसंती सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांना दिली. पक्षनिहाय विचार केल्यास शिवसेनेच्या उमदेवारांना पहिली पसंती दिली आहे. त्यानंतर आघाडीला त्याच्या खालोखाल महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मतदान केले आहे.भिवंडी पश्चिमेत ‘नोटा’चा वापर नाहीशासकीय नोकरदारांपैकी २१३ जणांनी चक्क ‘नोटा’ला पसंती दिली. यामध्ये सर्वाधिक ३६ जणांनी ‘नोटा’द्वारे ठाणे शहर मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नाकारले आहे. त्यापाठोपाठ कल्याण पश्चिम, मुंब्रा-कळवा आणि कल्याण पूर्व येथील उमेदवारांना नाकारले. तर, भिवंडी पश्चिम मतदारसंघात शासकीय नोकरदारांनी ‘नोटा’चा वापर केलेला नाही.ठाण्यात सर्वाधिक टपाली मतदान : जिल्ह्यात १८ मतदारसंघातून एकूण ७ हजार २३६ टपाली मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक १ हजार ५८ टपाली मतदान हे ठाणे शहर मतदारसंघात झाले असून त्यापाठोपाठ कल्याण पश्चिम येथे ७९७ तर सर्वात कमी टपाली मतदान भिवंडी पश्चिम येथे ७३ इतके झाले आहे.