सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका अभ्यासिकेला अचानक शिवसेना शिष्टमंडळाने शुक्रवारी दुपारी भेट देऊन मुलांच्या समस्या एकून घेतल्या. शिष्टमंडळात आमदार बालाजी किणीकर, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, युवाधिकारी बाळा श्रीखंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
उल्हासनगरातील गोर, गरीब व गरजू विद्यार्थाना यूपीएससी, एमपीएससी आदी स्पर्धात्मक परीक्षेत हक्काचे अभ्यास केंद्र हवे, यासंकल्पातून महापालिकेने कॅम्प नं-३ फॉरवर्ड लाईन चौक परिसरात दोन मजली अभ्यासकेंद्र उभारले. मुलांना हवे असलेले स्पर्धात्मक व चालू घडामोडीसह अन्य महत्वाची पुस्तके खरेदी करून इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या. शेकडो मुले अभ्यासकेंद्रात यूपीएससी, एमपीएससी आदी स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी येत असल्याने, अभ्यासकेंद्र मुलांनी गजबजून गेली. अभ्यासकेंद्रांची पाहणी व मुलांच्या समस्या ऐकण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अचानक भेट दिली. मुलांनीही न घाबरता विविध समस्या सांगून सोडविण्याची विनंती केली. तसेच सर्वसुविधायुक्त अभ्यासिका उपलब्ध करून दिल्या बाबत महापालिकेचे आभार व्यक्त केले.
शिवसेनेच्या शिष्टमंडळातील आमदार बालाजी किणीकर यांनी स्पर्धात्मक परीक्षे बाबतची मुलांची पूर्वतयारी याबाबत मुलांची मते एकून घेतली. तसेच त्यांना मार्गदर्शन करून काही सूचना केल्या. अभ्यासकेंद्रात मुलांना काय हवे, काय नको, याबाबत त्याचे म्हणणे ऐकून घेतले. शिवसेना शिष्टमंडळा मध्ये आमदार डॉ बालाजी किणीकर यांच्यासह शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहर युवाधिकारी बाळा श्रीखंडे, विनोद सालेकर, जावेद शेख, राजू साळवे, अरुण तांबे आदीजन