शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
2
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
3
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
4
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
5
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
6
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
7
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
8
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
9
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
10
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
12
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
13
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
14
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
15
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
16
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
17
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
18
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
19
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
20
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान

कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेतर्फे रमेश म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 1:25 AM

कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेतर्फे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना एबी फार्म मिळाल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता.

कल्याण : कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेतर्फे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना एबी फार्म मिळाल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. सोबतच, या मतदारसंघाचे प्रबळ दावेदार शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांनाही पक्षाने एबी फार्म दिल्याने त्यांनीदेखील शुक्रवारी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज भरला आहे. शिवसेनेकडून दोन उमेदवारांचे अर्ज आल्याने, शनिवारी अर्ज छाननीपश्चात कुणाचा अर्ज वैध ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.रमेश म्हात्रे यांनी शुक्रवारी दुपारी उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्यासोबत शिवसेनेचे कल्याण तालुकाप्रमुख एकनाथ पाटील यांच्यासह ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढवी, कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे आदी उपस्थित होते.पक्षाने म्हात्रे यांना अधिकृत उमेदवारी दिल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारीच जाहीर केले होते. म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खासदार शिंदे हेदेखील आले होते.यावेळी म्हात्रे म्हणाले की, पक्षाने भोईर यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यांचा वेगळा विचार पक्षाकडून केला जाणार आहे. त्यांच्याकडे सध्या असलेल्या जबाबदारीपेक्षा मोठी जबाबदारी पक्षाकडून दिली जाऊ शकते. शिवसेनेत नाराजी असू शकते; मात्र आदेश आल्यावर पक्षाचे काम शिवसैनिक करतो. त्याप्रमाणे भोईर हेदेखील मला निवडून आणण्यासाठी पक्ष आदेशानुसार काम करतील.खासदार शिंदे यांनी सांगितले की, म्हात्रे यांना उमेदवारी दिल्याने भोईर हे नाराज असतील, तर त्यांची नाराजी दूर करण्याचे काम पक्षाकडून केले जाईल. एकाच जागेसाठी अनेक जण इच्छुक असतात. पण, सगळ्यांना उमेदवारी देता येत नाही.दरम्यान, पक्षातर्फे अधिकृत उमेदवार कोण, हे अर्ज छाननीपश्चात स्पष्ट होणार असल्याचे स्पष्ट करून शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.कल्याण ग्रामीणचा शिवसेनेचा अधिकृत उमेदवार कोण होऊ शकतो, हे उद्या अर्ज छाननीनंतर स्पष्ट होईल. हा निर्णय राज्यासाठी मॉडेल ठरू शकतो. त्यामुळे या मतदारसंघासह अन्य ठिकाणीही हा विषय चर्चेचा आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalyan-rural-acकल्याण ग्रामीण