शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

शिवसेना सत्तेसाठी हपापलेली नाही- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 11:07 PM

विरोधी पक्षांना आपण अजूनही विरोधी पक्षात आहोत हे कळत नाही. त्यामुळे शिवसेनेला सत्ताधारी आणि विरोधीपक्ष अशा दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागतात, असे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

बदलापूर : विधानसभेत सर्वसामान्यांचे प्रश्न येतात तेव्हा मंत्रिपद बाजूला ठेवून शिवसेनेचे मंत्री, आमदार सर्वसामान्य नागरिकांच्या बाजूने उभे राहतात. शिवसेना सत्तेसाठी हपापलेली नाही. विरोधी पक्षांना आपण अजूनही विरोधी पक्षात आहोत हे कळत नाही. त्यामुळे शिवसेनेला सत्ताधारी आणि विरोधीपक्ष अशा दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागतात, असे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.बदलापूर शिवसेनेच्या वतीने मांजर्ली येथील गौरी हॉलमध्ये पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना शिंदे यांनी राज्यातील शिवसेनेची भूमिका मांडली. दिवसभर चाललेल्या मेळाव्यात शिवसेनेच्या कार्यपद्धतीची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आली. मेळाव्याच्या समारोप समारंभाला शिंदे उपस्थित होते. शिवसेनेने सर्वसामान्य नागरिकांची बांधिलकी जपल्याने २०१४ च्या विधानसभा, पालघर तसेच ठाणे जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा सर्वच निवडणुकांत यश मिळाल्याचे सांगितले. याप्रमाणेच येणारी प्रत्येक निवडणूक जिंकण्याच्या निश्चयाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी पदाधिकारी व कार्यक र्त्यांना केले.या वेळी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, आमदार मनीषा कायंदे, डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख वामन म्हात्रे, बदलापूरच्या नगराध्यक्ष विजया राऊत, उपनगराध्यक्ष सुनील भगत, गटनेते श्रीधर पाटील, उपजिल्हाप्रमुख एकनाथ शेलार, तालुकाप्रमुख बाळाराम कांबरी, वांगणी शहरप्रमुख प्रसाद परब आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुखांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असून त्यांच्या शब्दापुढे आम्हाला मंत्रिपद मोठे नसल्याचे शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांना एक लाख रुपये असलेली कर्जमाफीची मर्यादा दीड लाखापर्यंत करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आणि सरकारला तो निर्णय घ्यावा लागला, असे ते म्हणाले.चुकल्यास सेना धरते कानजेव्हा केंद्र वा राज्य सरकारकडून एखादा चुकीचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांत आधी विरोध उद्धव ठाकरे यांनी केला. नोटाबंदी, जीएसटी, भूमिअधिग्रहण कायदा अशा कोणत्याही प्रश्नावर त्यांनी तडजोड केली नाही. अंगणवाडी शिक्षक, आरक्षण, सर्वसामान्य, शेतकरी कुणाचाही प्रश्न असो शिवसेना त्यांच्यासाठी काम करत राहिली आहे आणि करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा