शहापूर : खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक अजित आळशी, शिवसेनेचे समीर अवसरे, युवा अध्यक्ष प्रियेश जगे, अस्मिता आळशी, प्रतीक्षा प्रदीप आळशी, मिताली भोपतराव, गीतांजली महाजन, मकरंद चव्हाण, मनोज पानसरे आणि राष्ट्रवादीचे अरुण धसाडे आदींनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. पाटील यांना वाढदिवसानिमित्त मोठी भेट असल्याचे सरचिटणीस सुभाष हरड यांनी सांगितले.
शहापूर नगर पंचायतीत शिवसेनेची सत्ता आहे. भाजपचे ३, राष्ट्रवादीचे ३ व उर्वरित सेनेचे १३ उमेदवार असे पक्षीय बलाबल आहे. त्यापैकी भाजपच्या तीन नगरसेवकांपैकी दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने वैदेही नार्वेकर या एकमेव भाजपच्या नगरसेविका आहेत. सेनेला शह देण्यासाठी भाजपने चंग बांधला असून मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.