शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

निवडणुकीपूर्वी शिवसेनेची खेळी; ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफीचा ठरावाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 8:49 PM

पालिकेच्या तिजोरीवर पडणार कोटय़ावधीचा भार, ठरू नये निवडणुकीचा जुमला, भाजपानं लगावला टोला

ठाणे  : ठाणे  महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचे वचन दिले होते. त्याला तब्बल साडेचार वर्षानी मुर्त स्वरुप आल्याचे दिसत आहे. गुरुवारी झालेल्या महासभेत ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचा ठराव मांडण्यात आला आणि त्याला मंजुरी दिली. परंतु कोरोनामुळे पालिकेची सध्याच्या आर्थिक स्थिती पाहता, हा ठराव किती तग धरणार हे पाहणो महत्वाचे ठरणार आहे. परंतु दुसरीकडे हा केवळ निवडणुकीचा जुमला ठरु नये अशी भावना देखील व्यक्त केली जात आहे.

गुरुवारी झालेल्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा दाखला देत, त्यांनी ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचा ठराव मंजुर करावा आणि शासनाकडे पाठवावा असे सांगितले आहे. त्यानुसार तसा ठराव सभागृहात घ्यावा अशी सुचना केली. त्याअनुषंगाने सभागृह नेते अशोक वैती यांनी तसा ठराव सभागृहात मांडला. त्याला विरोधी पक्षनेते शाणु पठाण यांनी मंजुरी दिली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मार्च २०२१ पासून याची अंमलबजावणी करण्याची सुचना केली. सत्ताधारी शिवसेनेकडून ठाणो महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफीचे वचन दिले होते. परंतु आता साडेचार वर्षानंतर त्याला मुर्त स्वरुप देण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना काळात निश्चितच ठाणोकरांसाठी ही गोड बातमी ठरणार आहे. त्यानुसार हा ठराव तयार करुन अंतिम मंजुरीसाठी शिष्ठ मंडळ घेऊन जाईल आणि त्याला मंजुरी आणून दाखवेल असा विश्वास यावेळी महापौर म्हस्के यांनी व्यक्त केला.

भाजपाची काढली हवासत्ताधाऱ्यांनी अचानकपणे हा ठराव मंजुर करुन घेऊन भाजपच्या विरोधाची हवाच काढली. त्यामुळे तब्बल २१ महिन्यानंतर होणाऱ्या  महासभेत सत्ताधाऱ्यांना सळोकी पळो करण्याच्या तयारीत आलेल्या भाजपच्या नगरसेवकांची एकाच फटक्यात सत्ताधाऱ्यांनी हवा काढली. त्यामुळे विरोध सोडून त्यांना देखील या ठरावाच्या बाजूने कौतुक करावे लागले. परंतु हा ठराव लवकर मंजुर करुन आणून ठाणोकरांना दिलासा द्यावा अशी मागणी करतांना हा निवडणुकीचा जुमला ठरु नये असेही भाजपने यावेळी मत व्यक्त केले.

ठरू नये निवडणुकीचा जुमलाकोरोनामुळे पालिकेच्या तिजोरीवर परिणाम झालेला आहे. सध्याच्या घडीला तिजोरीत अवघे ७ कोटी शिल्लक आहेत. त्यात मागील महिन्यात सातव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर १०० कोटींहून अधिकच बोजा पडणार आहे. शिवाय ठेकेदारांची आजही ६५० कोटींचे बिले अदा करायची आहेत. तसेच पालिकेवर सुमारे ४ हजार कोटींचे दायीत्व आहे. त्यात आता ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्याचा परिणाम देखील पालिकेच्या तिजोरीवर होणार आहे. हा ठराव मंजुर झाल्यास पालिकेच्या तिजोरीवर १५० ते १७५ कोटींच्या वर बोजा पडणार असल्याची माहिती पालिका सुत्रंनी दिली. त्यामुळे सातवा वेतन आयोग आणि करमाफी यामुळे पालिकेला सुमारे २७५ कोटींहून अधिकच उत्पन्नाला मुकावे लागणार आहे. त्यातही काही महिन्यांपूर्वी सत्ताधारी शिवसेनेच्या वरिष्ठ लोकप्रतिनिधी देखील करमाफी शक्य होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे हा निवडणुकीचा जुमला तर ठरणार नाही ना? अशी चर्चा रंगू लागली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका