शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

“भीती दाखवून खिसे कापा व राज्य करा असले राजकारण देशात सुरु”: सुषमा अंधारे 

By धीरज परब | Published: October 15, 2022 7:20 PM

सिंधुदुर्ग-रत्नागिरी गोव्याला आणि मुंबई गुजरातला जोडली तर आश्चर्य वाटायला नको इतके घाणेरडे राजकारण सुरु आहे, अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाजपाने राज्य करण्यासाठी लोकांची सहनशक्ती वाढवली व त्यांना संमोहित केले . त्यांनी एवढी महागाई वाढवली , जनतेचा खिसा कापला तरी लोकांनी बोलायचे नाही, केवळ नमो नमो म्हणायचे. लोक बोलले तर त्यांना देशभक्त नाहीत का ? हिंदू नाही का ? असे म्हणत देशद्रोही ठरवण्याची भीती दाखवून जनतेचे तोंड दाबून ठेवल्याची टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मीरारोड येथील महाप्रबोधन यात्रे वेळी केली . हिंदू म्हणायचे म्हणजे जनतेच्या बऱ्याच प्रश्नांपासून पळ काढण्यासाठी हे मोकळे असा आरोप भाजपा, शिंदे गट आदींवर केला . 

मीरारोडच्या शिवार उद्यान येथे शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेची सभा झाली . यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते . शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत व खासदार राजन विचारे , संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर , ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे सह सेनेचे पदाधिकारी , माजी नगरसेवक आदी उपस्थित होते . 

अंधारे म्हणाल्या की , हिंदूंचे आदर्श प्रभू श्रीरामाचे भाऊ लक्ष्मण यांनी वहिनी साठी जीवाची बाजी लावली .  मात्र शिवसैनिक भाऊ दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नीच्या मार्गात अडथळे आणणारे हे बेगडी हिंदुत्ववादी आहेत . त्यांना सत्ता दिसल्याने फडणवीस यांच्या सोबत हम दिल दे चुके सनम आणि सत्ता जायला लागली म्हणून शिवसैनिकांसोबत हम आपके है कोन असे चालवले आहे . फडणवीस स्क्रिप्ट लिहून देणारे लेखक व शिंदे वाचक असल्याची टीका त्यांनी केली . 

हे लोक महिलांचा आदर सन्मान करा म्हणतात पण राज्याला महिला बालकल्याण मंत्री नाही , एकही महिला मंत्रिमंडळात नाही . उद्या सिंधुदुर्ग - रत्नागिरी गोव्याला जोडली आणि मुंबई गुजरातला जोडली तर आश्चर्य वाटायला नको इतके घाणेरडे राजकारण सुरु आहे . स्वतःच्या स्वार्था साठी त्यांनी शिवसेनेला मतदान करणाऱ्या जनतेचा विश्वासघात केला अश्या गद्दारांना गाडून शिवसेना पुन्हा उभी राहील असे अंधारे म्हणाल्या . 

शिवसेना नेते अरविंद सावंत म्हणाले की , ज्या मोदींना बाळासाहेबांनी व शिवसेनेने वाचवले त्याच मोदी - शहा यांनी शिवसेना संपण्यासाठी २०१४ सालंच्या निवडणुकीत २७ सभा घेतल्या . उद्धव ठाकरे एकटेव शिवसैनिक होते तेव्हा ठाण्यातले दाढीवले कुठे होते ? ठाण्याच्या बाहेर पडले तरी का ?. २०१९ सालच्या निवडणुकीत युती केली पण सेनेच्या उमेदवारांना पाडण्यासाठी भाजपाने माणसे उभी केली . रमेश लटकेंना पाडण्यासाठी त्यावेळी उभ्या केलेल्या मुरजी पटेल यांना अंधेरी पोटनिवडणुकीत यावेळी भाजपाने उमेदवारी दिली आहे .  दिवंगत शिवसैनिक लटकेंच्या पत्नी यांना खोटे बनाव करून छळले जात आहे . प्रशासन गुलामा सारखे राबवले जात असल्याचा आरोप सावंत यांनी केला . 

भाषणात अंधारे , सावंत , विचारे आदींनी भाजपा सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे गटातील काही आमदारांवर टीकेची झोड तसेच खोचक टोले लगावले . स्थानिक पोलिसां कडून सभेतील नेत्यांच्या भाषणावर बारीक लक्ष ठेवले जात होते . छायाचित्रण सह भाषणातील वक्तव्ये याची नोंद केली जात होती . 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShiv SenaशिवसेनाMira Bhayanderमीरा-भाईंदर