ठाणे :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवती सेना पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर 15 ते 20 महिलांच्या गटाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री 10.30 ते 11 वाजण्याच्या सुमारास घडली.
कासरवडवली येथील त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडण्याच्या वेळी त्यांच्यावर हा हल्ला शिंदे गटाच्या महिलांनी कार्यालयात शिरून हा भ्याड हल्ला केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. यासंदर्भात कासरवाडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी रोशनी शिंदे यांनी तक्रार अर्जही केला आहे. दरम्यान, रोशनी उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.