शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

लॉकडाऊन रद्द न झाल्यास शिवसेना उतरणार रस्त्यावर, वामन म्हात्रे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 10:11 AM

शनिवारी माजी नगराध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी ८ मे पासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन रद्द करण्याबाबतचे निवेदन उपमुख्याधिकारी सुभाष नागप यांना दिले.

बदलापूर : बदलापुरात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. मात्र त्यानंतरही शहरात लॉकडाऊनचा गोंधळ सुरूच आहे. गरज नसताना कुणाच्या तरी दबावाखाली घाईघाईने नागरिकांवर हा लॉकडाऊन लादण्यात आला असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी केला आहे. हा लॉकडाऊन रद्द करण्याबाबत उद्यापर्यंत निर्णय न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला.शनिवारी माजी नगराध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी ८ मे पासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन रद्द करण्याबाबतचे निवेदन उपमुख्याधिकारी सुभाष नागप यांना दिले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान म्हात्रे यांनी कडक लॉकडाऊनच्या आदेशातील अनेक त्रुटींकडे लक्ष वेधले. सध्या शहरात राज्य सरकारने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. या काळात शहरात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर मुंबई महानगर क्षेत्रातील इतर शहरांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. पालिका प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या मागणीमुळे हा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यानुसार मेडिकल, दवाखाने, बँक वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत.दूध, भाजीपाला, किराणा आणि इतर गोष्टी घरपोच देण्याची परवानगी आहे. मात्र शहरात अशी सुविधा देणारे किती विक्रेते आहेत त्यांची यादी, मोबाइल नंबर वा वेबसाइटची माहिती नागरिकांना देण्यात आलेली नाही. अत्यावश्यक सेवेतील हजारो नागरिक दररोज मुंबई वा अन्य शहरात नोकरीसाठी जात असतात. त्यांना ये-जा करण्यासाठी रिक्षांची गरज असते. परंतु रिक्षा सेवा सुरू राहणार की नाही? याबाबत आदेशात काहीही नमूद करण्यात आलेले नाही. लॉकडाऊनमध्ये गोरगरीब नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून रेशन दुकानातून मोफत अन्नधान्य देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यांनी या कडक लॉकडाऊन काळात धान्य कसे मिळवावे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ग्रामीण नागरिकांना शहराचे दरवाजे बंदबदलापूर शहरात जवळच्या ग्रामीण भागातील आदिवासी, शेतकरी शेतमाल विक्रीसाठी बदलापुरात येत असतात. मात्र कडक लॉकडाऊनमुळे या लोकांना शहराचे दरवाजे बंद झाले आहेत? असे अनेक प्रश्न म्हात्रे यांनी उपस्थित केले आहेत. कुणाच्या तरी दबावाखाली कडक लॉकडाऊनचे आदेश काढले असून, त्याला शिवसेना शहरप्रमुख म्हणून माझी हरकत असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस