शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या बॅनरमधून गटबाजीचं प्रदर्शन!

By पंकज पाटील | Updated: June 19, 2024 16:33 IST

अंबरनाथ छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये दोन्ही गटाने एकमेकांचे फोटो टाळून उघडपणे आपली नाराजी दाखवून दिली आहे.

अंबरनाथ :अंबरनाथमध्ये शिवसेनेत असलेली गटबाजी वर्धापन दिनानिमित्त लागलेल्या बॅनर्समधून पुन्हा एकदा समोर आली आहे. या गटबाजीकरून काही दिवसांपूर्वी स्वतः खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून दोन्ही गटांचे कान टोचले होते. मात्र त्यानंतरही काहीही सुधारणा झाल्याचं दिसून येत नाही. अंबरनाथ छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये दोन्ही गटाने एकमेकांचे फोटो टाळून उघडपणे आपली नाराजी दाखवून दिली आहे.

अंबरनाथ शहरात शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे दोन गट असून आजवर अनेकदा या गटबाजीचे उघडपणे प्रदर्शन झाले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही याच गटबाजीमुळे सर्वाधिक विकासकामे करूनही अंबरनाथ शहरातून शिवसेनेला अवघ्या ३५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतः अंबरनाथ शहरात येऊन पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. मात्र याला आठवडाही उलटला नसताना पुन्हा एकदा वर्धापन दिनानिमित्त लागलेल्या बॅनर्समधून गटबाजी समोर आली आहे.

अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अगदी बाजूबाजूला दोन्ही गटांनी बॅनर्स लावले असून त्यावर एकमेकांचे फोटो मात्र टाकलेले नाहीत. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा या गटबाजीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता ३ महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत या गटबाजीचा पक्षाला फटका बसू नये, यासाठी वरिष्ठांनी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. - लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीसाठी खासदार श्रीकांत शिंदे अंबरनाथमध्ये येणार असल्याची कल्पना असताना देखील बैठकीच्या ठिकाणी शहराध्यक्षांचा फोटो एका गटाने डावळला होता. त्यावरून समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

 - आढावा बैठकीत फोटो वरून वाद निर्माण झालेला असताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढली होती तसेच पदाधिकाऱ्यांना देखील सज्जड दम देण्यात आला होता.

 - वाळेकर गट आणि आमदार किनीकर गट यांच्यात आता मोठ्या प्रमाणात वाद वाढले असून आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचे पडसाद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :ambernathअंबरनाथShiv SenaशिवसेनाShrikant Shindeश्रीकांत शिंदे