शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
4
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
5
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
6
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
7
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
8
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
9
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
10
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
11
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
13
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
14
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
15
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
16
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
17
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
18
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
19
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे ‘आरोग्यम् धनसंपदा’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 12:31 AM

‘आपला दवाखाना’च्या नावाखाली १६० कोटींची उधळपट्टी; राष्ट्रवादीचा आरोप, महासभेच्या मंजुरीआधीच काढली निविदा

ठाणे : दिल्लीतील मोहल्ला क्लिनीकच्या धर्तीवर ठाणे पालिका ‘आपला दवाखाना’ नावाची संकल्पना सुरू करीत आहे. किसननगर आणि कळवा येथील हा उपक्रम फोल ठरल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. लोकसंख्येच्या तुलनेत ठाण्यात २६ आरोग्य केंद्रांची गरज आहे. तरीही, अतिरिक्त ५० केंद्र सुरू करून सुमारे १६० कोटी रुपयांच्या उधळपट्टीचे कारण काय, असा सवाल करून, मेडिकल ऑन गो प्रायव्हेट लिमिटेडला हा ठेका देऊन त्याद्वारे विधानसभा निवडणुकीसाठी पैसा गोळा करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.यावेळी राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला, प्रदेश चिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई, नगरसेवक मुकूंद केणी, शानू पठाण उपस्थित होते. या दवाखान्याच्या निविदा प्रक्रियेच्या मंजुरीसाठी प्रस्ताव १९ तारखेच्या महासभेत पटलावर ठेवला आहे. मात्र, ही मंजुरी मिळण्याआधीच १४ जून रोजी वृत्तपत्रांमधून निविदा नोटीस जारी केली आहे. शहराच्या विविध भागात एकूण ५० आपला दवाखाना (ई हेल्थ स्मार्ट क्लिनिक) सुरू करण्याचा निर्णय महानगरपालिकेने मेडिकल आॅन गो प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून प्रस्तावित केला आहे. ते सुरू करताना दर ५० हजार नागरिकांमागे एक आरोग्य केंद्र असावे, असा नियम आहे. ठाणे शहराची लोकसंख्या सध्या २६ लाखांच्या घरात आहे. त्यापैकी ५० टक्के लोक हे चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्यास आहेत. हे पाहता ठाणे शहरात २६ आरोग्य केंद्रांची गरज आहे. आजमितीला ठाण्यात २८ आरोग्य केंद्र आहेत. त्यामुळे अतिरिक्त ५० केंद्र सुरू करून ठाणेकरांच्या १६० कोटी रु पयांची उधळपट्टीच केली जाणार आहे.किसननगर, कळव्यात योजना फेलसर्वात महत्त्वाचे म्हणजे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालय आणि शासनाच्या सिव्हील रु ग्णालयामध्ये ज्या सुविधा मोफत मिळत आहेत, त्यासाठीही या ‘आपला दवाखाना’मध्ये १० रु पये दर आकारला जाणार आहे.शिवाय, ही संकल्पना सर्वात आधी किसननगर आणि कळवा येथे राबविण्यात आली होती. मात्र, ती फोल ठरलेली आहे. या केंद्रांवर एकही माणूस फिरकत नाही. तरीही, आणखी ५० ठिकाणी ही योजना राबवून त्या माध्यमातून टक्केवारी घेण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा आणि प्रशासनाचा प्रयत्न आहे.दोषी अधिकाऱ्यास निलंबित करावे‘आपला दवाखाना’मुळे ठाणे महानगरपालिकेला पाच वर्षांसाठी १४४ कोटी आणि भांडवली खर्चापोटी १५.६० कोटी असे सुमारे १५९.६० कोटी मेडिकल ऑन गो प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीला द्यावे लागणार आहेत. हा सर्व ठाणेकरांच्या पैशांचा अपव्ययच आहे.त्यातही १९ जून रोजी होत असलेल्या महासभेमध्ये इच्छुक निविदाकारांकडून निविदा मागवण्यासाठीच्या प्रक्रि येचा प्रस्ताव पटलावर ठेवला आहे. तो मंजूर होण्याच्या आधीच संबधीत अधिकाऱ्यांनी १४ जून रोजीच निविदा नोटीस वृत्तपत्रांच्या माध्यमातून जारी केली आहे.म्हणजेच, हा प्रस्ताव मंजूर होईल, असे गृहीत धरले आहे. महासभेच्या मंजुरी आधीच निविदा काढणाºया अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी पाटील यांनी केली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक