शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
2
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
3
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
4
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
6
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
7
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
8
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
9
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
10
“राहुल गांधीची भूमिका संविधान बचाओ, फडणवीसांना शहरी नक्षलवाद का वाटतो?”; काँग्रेसचा सवाल
11
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
12
'बविआ'समोर भाजपचे आव्हान! जागा शिंदेंच्या पण उमेदवार भाजपचे
13
"काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणारच"
14
"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...
15
'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?
16
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
17
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
18
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
19
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
20
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

भाजपाविरोधात गुन्ह्याची शिवसेनेची मागणी, मीरा रोडची घटना : उद्यानाचे परस्पर उद्घाटन केल्याने चिघळला वाद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 6:24 AM

महापालिकेची परवानगी नसतानाही मीरा रोडच्या शांतीनगरमधील उद्यानाचे सत्ताधारी भाजपाकडून परस्पर उद््घाटन करण्यात आले.

मीरा रोड : महापालिकेची परवानगी नसतानाही मीरा रोडच्या शांतीनगरमधील उद्यानाचे सत्ताधारी भाजपाकडून परस्पर उद््घाटन करण्यात आले. स्थानिक नगरसेविकाही मला डावलण्यात आल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेविका दिप्ती भट यांनी केल्याने भाजपा-शिवसेना पुन्हा आमनेसामने आले आहेत.शांतीनगरच्या सेक्टर पाचमधील सरदार वल्लभभाई पटेल उद्यान व मैदानाचे उद्घाटन रविवारी सकाळी भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केले. या वेळी सभागृह नेते रोहिदास पाटील, स्थानिक नगरसेवक दिनेश जैन, अश्विन कासोदरिया व हेतल परमार यांच्यासह भाजपा गटनेते हसमुख गेहलोत, नगरसेवक प्रशांत दळवी, अनिल विराणी, सीमा शाह, माजी नगरसेविका डॉ. नयना वसाणी आदी उपस्थित होते. या उद्घाटनाची भाजपाची निमंत्रण पत्रिकाही सोशल मीडियावर सर्वांना पाठवण्यात आली होती.मागच्या पालिका कार्यकाळात प्रभागातील तत्कालीन नगरसेवक अश्विन कासोदरिया व नगरसेविका सीमा शाह यांच्या नगरसेवक निधीतून आणि महापालिका निधीतून हे उद्यान, खुली व्यायामशाळा, जॉगर्स ट्रॅक, खेळणी, मैदान आदी तयार करण्यात आल्याचा दावा भाजपाच्या नगरसेवकांनी केला आहे.उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका दिप्ती भट यांना दिलेल्या पत्रात मात्र उद्यानातील खेळणी, बसण्याचे बाकडे, व्यायामाचे साहित्य, लॅण्डस्केपिंग आदी खर्च उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या निधीतुन केल्याचे; तर काही खेळणी नगरसेवक अश्विन कासोदरीया यांच्या नगरसेवक निधीतून दिल्याचे स्पष्ट केल्याने भाजपाचे नेते लोकांची फसवणूक व दिशाभूल करत असल्याचा आरोप भट यांनी केला.भट यांनी १५ सप्टेंबरला पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते, शहर अभियंता शिवाजी बारकुंड व उद्यान अधीक्षक हंसराज मेश्राम यांना पत्र देऊन सेक्टर पाचमधील सरदार पटेल उद्यानाच्या उद्घाटनप्रसंगी प्रभागातील चारही नगरसेवकांना बोलावण्यात यावे, पक्षपातीपणा करु नये असे कळवले होते. प्रभागात भाजपाचे तीन, तर शिवसेनेचा एक नगरसेवक असल्याने भाजपाकडून परस्पर उद्घाटन करण्याचा प्रकार केला जाण्याची शक्यता भट यांनी वर्तवली होती. उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी उद्घाटनाबद्दलचे पत्र बांधकाम विभागास पाठवून दिले होते.त्यानंतरही भाजपाने १५ आॅक्टोबरला परस्पर उद्घाटनाचा घाट घातल्याचे कळताच भट यांनी शनिवारीच नयानगर पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतरही उद्घाटन झाल्याने आता भट यांनी सबंधितांवर बेकायदा प्रवेश करुन उद्घाटन करणे, नामफलक लावणे, चोरून वीज वापरणे, बेकायदा कार्यक्रम करणे आदी प्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.सोमवारच्या महासभेत आयुक्तांनीच उद्घाटने, भूमिपुजन, नामफलक लावणे आदी कामे नगरसेवकांकडून परस्पर केली जात असल्याच्या तक्रारी येत असल्याचे नमूद करत याबाबत निर्णय घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे महासभेकडे लक्ष लागले आहे.जैन यांचे नामफलक तोडलेया उद्यानाच्या उद्घाटनासाठी आधीच नामफलक तयार केले गेले होते. त्यावर तत्कालीन महापौर गीता जैन यांचे नाव होते. पण ते नामफलक आता तोडून टाकण्यात आल्याचे आढळून आल्याने भाजपाअंतर्गत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा