शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
2
राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
3
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
4
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
5
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
6
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
7
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
8
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
9
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
10
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
11
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
12
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
13
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
14
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
15
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
16
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
17
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
18
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
20
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 

शिवसेनेच्या मल्लेश शेट्टींचे नगरसेवकपद रद्द

By admin | Published: March 25, 2016 12:55 AM

अनधिकृत बांधकाम प्रकरणी कल्याण-डोंबिवली पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे नगरसेवकपद पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी बुधवारी रद्द

कल्याण : अनधिकृत बांधकाम प्रकरणी कल्याण-डोंबिवली पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे नगरसेवकपद पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी बुधवारी रद्द केले. कार्यालयाचे बांधकाम अनधिकृतपणे केल्याची त्यांच्याविरोधात तक्रार होती. त्याआधारे ही कारवाई झाली.अनधिकृत बांधकामप्रकरणी कारवाई झालेले शेट्टी हे दुसरे नगरसेवक असून याआधी काँग्रेसचे नगरसेवक सचिन पोटे यांचे पद रद्द झाले होते.शेट्टी यांच्या अनधिकृत बांधकामाची तक्रार सर्वप्रथम तक्रार माजी खासदार आनंद परांजपे यांनी केली होती. पालिकेने त्यांचे बांधकाम अनधिकृत म्हणून घोषितही केले होते. परंतु, पालिकेत युतीचीच सत्ता असल्याने कारवाई झाली नव्हती. लोकग्राम प्रभागातून शेट्टी या वेळच्या पालिका निवडणुकीत भाजपाचे उमेदवार नरेंद्र गुप्ते यांचा पराभव करून निवडून आले. त्यानंतर, गुप्ते यांनीही अनधिकृत बांधकामप्रकरणी शेट्टी यांचे पद रद्द करण्याची मागणी केली आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर, सहा आठवड्यात कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, ही कारवाई झाली. आयुक्त भाजपाच्या दबावाखाली काम करीत आहेत. त्यांना माझे नगरसेवकपद रद्द करण्याचा अधिकार नाही. माझ्यावर अन्याय झाला असून मी न्यायालयात दाद मागणार आहे.- मल्लेश शेट्टी, नगरसेवक, शिवसेना