शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कचरा प्रक्रियेला शिवसेनेचे समर्थन तर महाविकास आघाडीचा विरोध!

By पंकज पाटील | Published: April 06, 2023 6:44 PM

बदलापूरच्या सामायिक कचरा प्रक्रिया प्रकल्पाला महाविकास आघाडीने विरोध केला आहे.

बदलापूरबदलापूरच्या सामायिक कचरा प्रक्रिया प्रकल्पाला महाविकास आघाडीने विरोध केला आहे. या प्रकल्पात बदलापूरसह अंबरनाथ आणि उल्हासनगरचाही कचरा आणला जाणार असल्याने महाविकास आघाडीने विरोध दर्शवला असून या प्रकल्पाविरोधात आंदोलनही करण्यात येणार आहे.   

बदलापूर सर्व्हे क्रमांक १८८ या भूखंडावर उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर सामायिक कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे. अशाप्रकारचा हा देशातला पहिलाच प्रकल्प असल्याने आयआयटी सारख्या संस्थेनंही या प्रकल्पाचे कौतुक केले आहे. मात्र या प्रकल्पाला महाविकास आघाडीने अचानक विरोध दर्शवला आहे. याबाबत शुक्रवारी बदलापूरमध्ये महाविकास आघाडीकडून आंदोलनही केले जाणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या बदलापुरातील पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. दुसरीकडे शिवसेना इच्छा असतानाही या प्रकल्पाला विरोध करताना दिसत नाही. संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला विरोध न करता केवळ अंबरनाथचा कचरा थेट बदलापूरच्या डम्पिंग ग्राउंडला टाकण्यास विरोध करीत आहे. 

अंबरनाथच्या डम्पिंगवर हरित लवादाचे ताशेरे अंबरनाथच्या चिखलोली परिसरातील सर्व्हे क्रमांक १३२ वर अंबरनाथचं सध्याचं डम्पिंग ग्राउंड आहे. मात्र हे डम्पिंग लोकवस्तीला अगदीच लागून असल्यानं इथल्या रहिवाशांनी थेट राष्ट्रीय हरित लवादाकडे याची तक्रार केली, त्यानंतर हरित लवादाने हे डम्पिंग तातडीनं बंद करण्याचे आदेश दिलेत. यानंतर ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अंबरनाथचा कचरा तात्पुरत्या स्वरूपात बदलापूरच्या सध्याच्या डम्पिंगला टाकण्याचे आदेश दिलेत.

बदलापूरकरांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला विरोध जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाला बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी विरोध दर्शवला. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरचा एकत्रित प्रकल्प होईल तेव्हा कचरा आणा, पण आत्ता अंबरनाथचा कचरा बदलापूरला नको, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. सोबतच एकत्रित प्रकल्पाला आमचा विरोध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या याच भूमिकेचा आता विरोधक फायदा उचलण्याचा प्रयत्न करीत आहेत.

महाविकास आघाडीचा थेट प्रकल्पालाच विरोधशिवसेनेने सध्याच्या कचऱ्याला विरोध करताच महाविकास आघाडीने हाच मुद्दा पकडला आणि थेट खासदार श्रीकांत शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सामायिक कचरा प्रक्रिया प्रकल्पालाच विरोध दर्शविला. यामुळे शिवसेनेची मात्र अडचण झाली आहे.

टॅग्स :badlapurबदलापूरShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShrikant Shindeश्रीकांत शिंदे