शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे ६० प्लसचे लक्ष्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 10:47 PM

Mira-Bhayander Municipal Corporation Election : मीरा भाईंदर शिवसेनेने येणाऱ्या महापालिका निवडणुकीत ६० प्लस जागा जिंकण्याचे लक्ष्य जाहीर केले आहे . भगवा सप्ताहच्या माध्यमातून जनसंपर्क मोहीम सुरु केली जाणार आहे .

मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे ६० प्लसचे लक्ष्य  मीरारोड - मीरा भाईंदर शिवसेनेने येणाऱ्या महापालिका निवडणुकीत ६० प्लस जागा जिंकण्याचे लक्ष्य जाहीर केले आहे . भगवा सप्ताहच्या माध्यमातून जनसंपर्क मोहीम सुरु केली जाणार आहे . आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत खासदार राजन विचारे व आमदार गीता जैन सह सेनेचे नगरसेवक , पदाधिकारी उपस्थित होते.

मीरा भाईंदर महापालिका निवडणूक तोंडावर आली असून ऑगस्ट मध्ये पालिकेचा कार्यकाळ संपणार आहे . ३ सदस्य प्रभाग पद्धतीने होणाऱ्या या निवडणुकीत ९५ वरून जागा वाढून आता ११६ जागा असणार आहेत .  मीरा भाईंदर शिवसेनेतील दोन नगरसेविका अनिता पाटील आणि दीप्ती भट यांनी भाजपाशी घरोबा केल्याने सेने कडे सध्या १९ नगरसेवक आहेत. 

शहर शिवसेनेची सर्व सूत्रे आ. सरनाईक यांच्या हाती असली तरी मागील निवडणुकीत काही चुकलेले तिकीट वाटप , पदाधिकारी नियुक्तीचे वाद आणि भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या त्यावेळच्या मतदार संघात केलेले दुर्लक्ष आदी अनेक कारणांनी सेनेला २०१७ च्या पालिका निवडणुकीत फटका बसला होता. शिवाय सेनेतील काही पदाधिकारी-नगरसेवकांची निष्क्रियता व अंतर्गत वाद सुद्धा कारणीभूत ठरत आहेत .

मीरा भाईंदर मतदार संघात आता अपक्ष आमदार गीता जैन ह्या शिवसेनेच्या बाजूने असल्या तरी आ . जैन व आ. सरनाईक यांच्यातील मतभेद , खा . विचारे व आ. जैन यांच्यात सामंजस्य असले तरी आ. सरनाईक  नसल्याने नगरसेवक व पदाधिकारी यांची होणारी कोंडी चर्चेचा विषय ठरले आहेत.

परंतु रविवारी रात्री आ .  सरनाईक यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत खा . विचारें सह आ . गीता जैन सुद्धा उपस्थित होत्या. त्यामुळे उपस्थित नगरसेवक व पदाधिकारी यांनी देखील काहीसा सुटकेचा निश्वास टाकला असल्याचे सांगितले जाते . आ. जैन यांनी तर ९० प्लस का नको ? असे सांगत बैठकीत जोश भरला . आ . सरनाईक यांनी देखील सर्वानी एकजुटीने - एकदिलाने कामाला लागा असे आवाहन केले . यावेळी खासदार व दोन्ही मदारांनी पालिकेवर भगवा फडकवण्याचा संकल्प जाहीर केला .  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMira Bhayanderमीरा-भाईंदर